मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

VLC मीडिया प्लेयर वापरत असाल तर सावधान! चीनी हॅकर्स करतायेत तुमची हेरगिरी

VLC मीडिया प्लेयर वापरत असाल तर सावधान! चीनी हॅकर्स करतायेत तुमची हेरगिरी

VLC मीडिया प्लेयर वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चायनीज हॅकर्स मालवेअरवर हल्ला करण्यासाठी कसे काम करतात हे या अहवालातून समोर आले आहे, तुम्हीही VLC Player वापरत असाल तर नक्की वाचा.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 11 एप्रिल : व्हीएलसी मीडिया प्लेयर (VLC Media Player) हे जागतिक स्तरावर अतिशय लोकप्रिय मीडिया प्लेयर्सपैकी एक आहे, बहुतेक गॅजेटमध्ये तुम्हाला हे अॅप ऑडिओ आणि व्हिडिओ प्ले करण्यासाठी आढळेल. हे अॅप खूप लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे ते विनामूल्य आहे. शिवाय सर्व प्लॅटफॉर्मवर चालते. आता अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की हॅकर्स वापरकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी VLC Player वापरत आहेत. यातून मालवेअर अटॅक करत आहेत.

होय, तुमच्या VLC Media Player मध्ये देखील मालवेअर लपले असल्याची शक्यता असू शकते. या अहवालानुसार, सायबर गुन्हेगार मालवेअर पसरवण्यासाठी आणि सरकारी संस्था आणि इतर कंपन्यांची हेरगिरी करण्यासाठी VLC चा वापर करत आहेत. हा हॅकिंग ग्रुप दुसरा कोणी नसून कुप्रसिद्ध चिनी ग्रुप Cicada असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

सिमेंटेक साइबरसिक्योरिटी यूनिटच्या अहवालात असे दिसून आले आहे की चीनी हॅकिंग गट Cicada सरकार आणि इतर कंपन्यांची हेरगिरी करण्यासाठी Windows संगणक आणि लॅपटॉपवर Vlc Player वापरून मालवेअर पसरवण्याचे काम करत आहे.

UPI पेमेंट फेल होतंय? काय असू शकतात यामागची कारणं

या देशांमध्ये मालवेअर हल्ल्याचे संकेत

कॅनडा, अमेरिका, तुर्कस्तान, हाँगकाँग, मॉन्टेनेग्रो, इस्रायल, इटलीमध्ये मालवेअर पसरल्याचे अहवालात दिसून आले आहे. मालवेअर अटॅकपासून भारतही सुटलेला नाही, भारताचे नावही या यादीत सामील आहे.

अशा प्रकारे व्हायरस सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश करतो

हे हॅकिंग गट VLC ची क्लीन वर्जन कॅप्चर करतात आणि मीडिया प्लेयर एक्सपोर्ट फंक्शनसह व्हायरस फाइल समाविष्ट करतात. एकदा मालवेअर फाइल सॉफ्टवेअरमध्ये प्रविष्ट केल्यानंतर, ते VNC रिमोट-ऍक्सेस सर्व्हरद्वारे सिकाडा सिस्टमचे संपूर्ण नियंत्रण घेतात.

हॅकिंग (Hacking) टाळण्यासाठी तुमचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा आणि तुमच्या डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा. मजबूत पासवर्ड वापरण्यासोबतच, तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेण्याची खात्री करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका, मग बक्षिसे किंवा काहीही असो. असे केल्याने तुमचे पैसे आणि महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.

First published:

Tags: China, Hacking