मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या काळात या CNG Cars ठरतील चांगला पर्याय, मिळेल 30 किमीहून अधिक मायलेज

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या काळात या CNG Cars ठरतील चांगला पर्याय, मिळेल 30 किमीहून अधिक मायलेज

चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात.

चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात.

चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात.

नवी दिल्ली, 24 एप्रिल :  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Prices) सातत्यानं वाढ होत आहे. देशातल्या सर्व वाहनधारकांना याची झळ बसत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक आता सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) पर्याय स्वीकारू लागले आहेत. सीएनजी वाहनांनी (CNG Cars) भारतात चांगला जम बसवला आहे. इलेक्ट्रिक वाहनं हळूहळू लोकप्रिय होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 21 एप्रिल रोजी पेट्रोल प्रति लीटर 105.41 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 96.67 रुपये या दरानं विकलं जातं होतं. सीएनजीच्या किमतीतही वाढ झालेली असली, तरी पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. सध्या सीएनजी 71.61 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात. फायनान्शियल एक्स्प्रेसनं याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या अशा काही सीएनजी कार्स उपलब्ध आहेत, की ज्या चांगलं मायलेज (Mileage) देतात. शिवाय या गाड्यांची शोरूम प्राइस (दिल्ली शहर) 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या गाड्यांपैकी चार गाड्यांचं अ‍ॅव्हरेजही 30 पेक्षा जास्त आहे. मारुती अल्टो 800 मारुतीची ही सीएनजी कार प्रति किलो 31.59 किलोमीटर्स मायलेज देते. या गाडीची किंमत 3.39 ते 5.03 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. गाडीत 796 सीसी क्षमतेचं इंजिन (Engine) असून ट्रान्समिशन (Transmission) मॅन्युअल आहे. ही चार ते पाच सीटर हॅचबॅक कार आहे. मारुती स्विफ्ट डिझायर टूर (Maruti Swift Dzire Tour) - ही कार प्रति किलो सीएनजीला 31.12 किलोमीटर्स मायलेज देते. 1197 सीसी इंजिन असलेल्या या कारची किंमत 6.5 ते 7.4 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. गाडीचं ट्रान्समिशन मॅन्युअल आहे. ही सेडान (Sedan) कॅटेगरीतली 5 सीटर कार आहे. मारुती एस-प्रेसो (Maruti S-Presso) - 4 ते 5.64 लाख रुपये किंमत असलेली ही सीएनजी कार प्रति किलो 31.2 किलोमीटर मायलेज देते. कारमध्ये 998 सीसी इंजिन आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारचं ट्रान्समिशन उपलब्ध असलेल्या या हॅचबॅक (Hatch Back) कारमध्ये चार किंवा पाच व्यक्ती बसू शकतात.

हे वाचा - ‘या’ आहेत स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट मायलेज देणार्‍या 5 सीएनजी कार, जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro) - ह्युंदाईची ही कार 30.48 किलोमीटर्स मायलेज देते. 1086 सीसी इंजिन क्षमता असलेल्या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. ही पाच सीटर हॅचबॅक कार 4.87 ते 6.38 लाख रुपये किमतीपर्यंत मिळते. ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) - ह्युंदाईची ही सीएनजी कार 6 ते 9.42 लाख रुपये किमतीपर्यंत मिळते. प्रति किलो 28 किलोमीटर्स मायलेज देणाऱ्या या कारमध्ये 1197 सीसीचं इंजिन आहे. गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. सेडान कॅटेगरीतल्या या गाडीत पाच प्रवासी बसू शकतात. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात या पाच सीएनजी कार्स चांगला पर्याय ठरू शकतात. त्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर या कार्सचा विचार करण्यास हरकत नाही.
First published:

Tags: Car

पुढील बातम्या