नवी दिल्ली, 21 एप्रिल: पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Rates) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या किमती पाहून कार घेण्याचा प्लॅन करणाऱ्या अनेकांचं बजेट गडबडलंय. दरम्यान, तुम्हीही नवीन कार (News Car) घेण्याचा विचार करत असाल, तर अशावेळी CNG कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. सीएनजी कारला (CNG Car) चांगलं मायलेज मिळतं आणि ते पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त आहे. आज आम्ही तुम्हाला 5 स्वस्त सीएनजी कारबद्दल सांगत आहोत… मारुती सुझुकी अल्टो मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) ही सर्वांत स्वस्त हॅचबॅक कारपैकी एक आहे. या कारमध्ये 800 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 40hp पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. कारची सुरुवातीची किंमत 4.66 लाख रुपये आहे. ही कार सीएनजीवर चालल्यास 31.59 किमी प्रति किलो मायलेज देते. मारुती सुझुकी सेलेरियो मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) ही कंपनीच्या सर्वात लोकप्रिय सीएनजी कारपैकी एक आहे. ही कार फास्ट हँडलिंग, फीचर्स, लुक आणि कमी किमतीसाठी ओळखली जाते. Maruti Suzuki Celerio CNG हॅचबॅकमध्ये 1.0-लिटर इंजिन आहे, जे 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. Maruti Suzuki Celerio CNG व्हेरियंट 30.47 किमी प्रति किलो मायलेज देते. ही कार CNG प्रकार VXi आणि VXi(O) ट्रिम व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 5.85 लाख आणि 5.90 लाख रुपयांच्या दरम्यान (एक्स-शोरूम) आहे. 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत Made In India SUV Car, जाणून घ्या फिचर्स मारुती सुझुकी वॅगनआर मारुतीने नुकतंच वॅगन आरचं अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. त्याच्या CNG व्हेरियंटमध्ये 7-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि Android Auto Apple कार प्ले कनेक्टिव्हिटी आहे. मारुती वॅगन आरच्या CNG व्हेरियंटमध्ये तुम्हाला 1.0 लिटर इंजिन मिळेल. जे 5500 rpm वर 68ps ची पॉवर आणि 2500 rpm वर 90Nm टॉर्क जनरेट करते. WagonR CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.83 लाख रुपये आणि 5.89 लाख रुपये आहे. ह्युंदाई सँट्रो Hyundai Santro ही भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी कार आहे. नवीन जनरेशनची Hyundai Santro मॅग्ना आणि Sportz ट्रिम्समध्ये CNG पर्यायासह उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लीटर चार-सिलेंडर इंजिन आहे. Santro CNG 30.48 km प्रति किलो मायलेज देते. Santro चे CNG व्हेरियंट 5.92 लाख रुपये आणि 6.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत उपलब्ध आहेत. ह्युंदाई ग्रँड i10 Nios Nios CNG मध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, रियर पार्किंग कॅमेरा, रियर डिफॉगर, 15-इंच डायमंड कट अलॉय व्हील, Apple CarPlay आणि Android Auto सह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतात. यात 1,197cc VVT पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 6,000rpm वर 68hp पॉवर आणि 4,000rpm वर 95Nm टॉर्क जनरेट करते. Hyundai Grand i10 Nios CNG च्या Magna व्हेरियंटची किंमत 6.62 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तर, या आहेत पाच सर्वोत्तम सीएनजी कार. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने लोकांचा सीएनजी कार खरेदी करण्याकडे कल वाढू लागला. तुम्ही कार घेण्याच्या विचारात असाल तर वरील पाचपैकी जी कार तुमच्या बजेटमध्ये असेल ती घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.