मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ट्विटरचं पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन होणार नाही रिलाँच! 'या' कारणामुळे एलॉन मस्क यांनी घेतली माघार

ट्विटरचं पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन होणार नाही रिलाँच! 'या' कारणामुळे एलॉन मस्क यांनी घेतली माघार

ट्विटरचं पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन होणार नाही रिलाँच! 'या' कारणामुळे एलॉन मस्क यांनी घेतली माघार

ट्विटरचं पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन होणार नाही रिलाँच! 'या' कारणामुळे एलॉन मस्क यांनी घेतली माघार

 एलॉन मस्क कंपनीचे मालक झाल्यापासून ट्विटरमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मस्क यांनी कंपनीचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर: एलॉन मस्क कंपनीचे मालक झाल्यापासून ट्विटरमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मस्क यांनी कंपनीचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. या बदलांमध्ये ‘पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन’च्या घोषणेचाही समावेश होतो. ट्विटरवर 'पेड व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शन' लाँच करण्याचं काम काही कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं. दिलेल्या मुदतीमध्ये हे काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा इशारा एलॉन मस्क यांनी दिला होता. ठरल्याप्रमाणे हे फीचर लाँचही झालं होतं. पण, काही युजर्सनी पहिल्या दोन दिवसांत या फीचरचा गैरवापर केला. त्यामुळे अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. फेक अकाउंटची संख्या वाढू लागली. यानंतर मस्क यांनी पेड सबस्क्रिप्शन तात्पुरतं बंद केलं. काही सिक्युरिटी आणि प्रायव्हसी पॉलिसी मजबूत करून 29 नोव्हेंबरला ते रिलाँच केलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. 29 नोव्हेंबर ही तारीख स्वत: एलॉन मस्क यांनी जाहीर केली होती. मात्र, आता या दिवशी पेड सबस्क्रिप्शन रिलाँच होणार नाही, असं ट्विट मस्क यांनीच केलं आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी युजर्सना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. एलॉन मस्क यांनी सोमवारी सांगितलं की, जोपर्यंत या प्लॅटफॉर्मवर डुप्लिकेट आयडी थांबवण्यास सक्षम यंत्रणा तयार होत केली जात नाही, तोपर्यंत ते ब्लू टिक व्हेरिफिकेशन रिलाँच करणार नाहीत. अलीकडेच ट्विटर कर्मचार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत मस्क म्हणाले होते की, दरमा आठ डॉलर्सचा ब्लू टिक सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्याची वेळ निश्चित नाही. फेक अकाउंट्सवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा जोपर्यंत कार्यरत होत नाही तोपर्यंत पेड सबस्क्रिप्शन लाँच होणार नाही.

हेही वाचा: Netflix अकाउंट तुमचं अन् मजा दुसरं कुणीतरी घेतंय? असं करा Remove

इतकंच नाही तर मस्क यांनी सोमवारी (21 नोव्हेंबर) सांगितलं की, कंपनी वैयक्तिक अकाउंट्स आणि संस्था व कंपन्यांच्या अकाउंट्ससाठी वेगवेगळ्या रंगांच्या टिक्स वापरू शकते. कंपनी यावर काम करत आहे. लवकरच या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल.

याशिवाय, सध्या ट्विटरची कार्यकारिणी मोठ्या बदलांमधून जात आहे. कारभार हाती आल्यानंतर मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. कर्मचाऱ्यांनी 'हार्डकोर वातावरणात' काम करावं अथवा नोकरी सोडून जावी, असा अल्टिमेटम कर्मचाऱ्यांना मिळाला होता. याचा धसका घेऊन अनेकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. त्यापूर्वी मस्क यांनी स्वत: काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. या सर्व गोष्टीचा कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. तरीही मस्क आणखी लोकांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहेत.

First published:

Tags: Elon musk, Twitter