मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का?

ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का?

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यावर अनेक वादग्रस्त गोष्टी घडू लागल्या आहेत. मस्क यांनी कंपनीत काम करत असलेल्या अमेरिकेतल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकलं. त्याचप्रमाणे भारतातल्याही सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यावर अनेक वादग्रस्त गोष्टी घडू लागल्या आहेत. मस्क यांनी कंपनीत काम करत असलेल्या अमेरिकेतल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकलं. त्याचप्रमाणे भारतातल्याही सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यावर अनेक वादग्रस्त गोष्टी घडू लागल्या आहेत. मस्क यांनी कंपनीत काम करत असलेल्या अमेरिकेतल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकलं. त्याचप्रमाणे भारतातल्याही सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 नोव्हेंबर : एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यावर अनेक वादग्रस्त गोष्टी घडू लागल्या आहेत. मस्क यांनी कंपनीत काम करत असलेल्या अमेरिकेतल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकलं. त्याचप्रमाणे भारतातल्याही सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. भारतात अजून तसं काही घडलेलं नाही; मात्र भारतातले रोजगार कायदे याबाबत काय सांगतात हे जाणून घेऊ या.

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अमेरिकेतल्या 3500पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी (4 नोव्हेंबर) भारतातही इंजिनीअरिंग, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातल्या 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याबाबत शनिवारी (5 नोव्हेंबर) एलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट टाकली होती. ‘सध्या कंपनीला प्रतिदिन 4 मिलियन डॉलर एवढं नुकसान होत आहे. त्यामुळे कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. या सर्व कर्मचाऱ्यांना त्या बदल्यात 3 महिन्यांच्या पगाराइतका मोबदला दिला जाणार आहे. ही रक्कम कायदेशीररित्या मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा 50 टक्के जास्त आहे,’ असं त्यात म्हटलं होतं.

या विरोधात अमेरिकेतल्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. वर्कर अ‍ॅडजस्टमेंट अँड रिट्रेनिंग नोटिफिकेशनच्या अंतर्गत 60 दिवसांची पूर्वसूचना देण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भारतात मात्र अजून अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. भारतातले रोजगार व श्रमिक कायदे काय सांगतात, ते पाहू.

भारतात केंद्र आणि राज्य सरकारांनी रोजगार नियंत्रित करण्यासाठी व श्रमिकांच्या हितासाठी कायदे बनवले आहेत. उद्योगधंद्यामध्ये कामगारांच्या कामाच्या आधारावर इंडस्ट्रियल डिस्प्युट्स अ‍ॅक्ट, फॅक्टरीज अ‍ॅक्ट अँड एस्टाब्लिशमेंट अ‍ॅक्टमध्ये कामगारांची व्याख्या करण्यात आली आहे. इंडस्ट्रियल डिस्प्युट्स अ‍ॅक्ट कामगारहितासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, कामगार म्हणजे कोणत्याही उद्योगधंद्यात काम करणारा कर्मचारी असं म्हटलं आहे. ते करारावर किंवा मोबदल्यासाठी कौशल्यपूर्ण, अकुशल, तांत्रिक, ऑपरेशनल, क्लेरिकल किंवा सुपरवायझर अशा पद्धतीचं काम करणारे असू शकतात; मात्र 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारी या कायद्यातल्या कामगारांच्या व्याख्येत बसत नाहीत.

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

ट्विटरमधून नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यामुळे ते कर्मचारी इंडस्ट्रियल डिस्प्युट्स अ‍ॅक्ट किंवा इतर रोजगार कायद्यांच्या अंतर्गत कामगार म्हणवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना हे कायदे लागू होऊ शकत नाहीत. भारतातल्या ट्विटर कर्मचाऱ्यांना त्यांच्या करारानुसार असणारे रोजगार नियम लागू होतात. या करारात नियम व अटी स्पष्ट नमूद केलेल्या असतात. सामान्यपणे कोणत्याही कंपनीचा मालक कर्मचाऱ्यांना करारानुसार पूर्वसूचना देऊन काढू शकतो. नोटीसचा कालावधी 60 किंवा 90 दिवसांचा असू शकतो. तसंच कामावरून तत्काळ काढून टाकण्याचीही मुभा कंपनी मालकाला असते. अशा वेळी नोटीस कालावधीच्या म्हणजे 60 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो. कर्मचाऱ्यावर गैरव्यवहार किंवा बेशिस्तीबाबत कारवाई करण्यात आली असेल, तर हा नियम लागू होत नाही. त्यामुळे सध्या तरी ट्विटर कर्मचाऱ्यांकडे कंपनीविरोधात आवाज उठवण्यासाठी कायदेशीर आधार नाही; मात्र तरीही कर्मचारी कंपनीविरोधात न्यायालयात जाऊ शकतात. आता भारतीय कर्मचारी काय पावलं उचलतात हे लवकरच कळेल.

First published:

Tags: Elon musk, Twitter