जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी आता मोजावे लागणार हजारो रुपये! जाणून घ्या काय आहे एलॉन मस्क यांचा बिझनेस प्लॅन

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी आता मोजावे लागणार हजारो रुपये! जाणून घ्या काय आहे एलॉन मस्क यांचा बिझनेस प्लॅन

Twitter

Twitter

ट्विटरवर ‘पेड व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शन’ लाँच करण्याचं काम काही कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे. दिलेल्या मुदतीमध्ये हे काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा इशारा एलॉन मस्क यांनी दिला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 31 ऑक्टोबर: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. मध्यंतरी काही कारणास्तव ही पर्चेसिंग डील तात्पुरतं होल्डवर ठेवलं गेलं होतं. मात्र, आता हे डील पूर्ण झालं आहे. ट्विटर मस्क यांच्या ताब्यात जाताच त्यांनी अनेक बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. सर्वांत अगोदर त्यांनी ट्विटरच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल केले आहेत. सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर आता मस्क यांनी आपल्या इतर कर्मचाऱ्यांनाही डेडलाइन्ससह नवनवीन कामं असाइन करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर ‘पेड व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शन’ लाँच करण्याचं काम काही कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे. दिलेल्या मुदतीमध्ये हे काम न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा इशारा एलॉन मस्क यांनी दिला आहे. ‘द व्हर्ज’ या अमेरिकन वेबसाईटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    ‘द व्हर्ज’नं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीकडून सध्या युजर्सना सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी महिन्याला 4.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 400रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. या सबस्क्रिप्शनमुळे अकाउंट व्हेरिफाय होण्याबरोबरच युजर्ससाठी काही अतिरिक्त फीचर्स अनलॉक होतात. मात्र, आता कंपनी ट्विटर अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी अधिक पैसे आकारण्याची योजना आखत आहे. ही नवीन योजना अंमलात आणण्यासाठी या प्रोजेक्टवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना रविवारी (30 ऑक्टोबर) याबाबत आदेश देण्यात आले. योजना पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत काम झालं नाही तर त्यांना आपली नोकरी गमवावी लागेल.

     हेही वाचा - एलन मस्क स्वतः ट्विटरचे सीईओ होणार? ट्विटरमधील नव्या बदलांबाबत युजर्समध्ये उत्सुकता

    ट्विटर अकाउंट्स कशी व्हेरिफाय करायची आणि बॉट्स कसे हाताळायचे यामध्ये सुधारणा करणार असल्याचं एलॉन मस्क यांनी रविवारी स्पष्ट केलं आहे. “संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये सध्या सुधारणा केल्या जात आहेत,” असं ट्विट मस्क यांनी केलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नवीन ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी कंपनी दरमहा 19.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे एक हजार 647 रुपये आकारण्याची योजना आखत आहे. या योजनेअंतर्गत, व्हेरिफाइड अकाउंट असलेल्या युजर्सना सबस्क्रिप्शन घेण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीमध्ये जर त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं नाही तर त्यांच्या कंपनी अकाउंटवरील ‘ब्ल्यू टिक’ काढून घेतली जाईल.

    ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी आता मोठं शुल्क आकारण्याचा विचार करत आहे, अशी माहिती सर्वप्रथम प्लॅटफॉर्मर न्यूजच्या केसी न्यूटन यांनी उघड केली होती. न्यूटन यांनी दिलेल्या बातमीवर ट्विटरच्या प्रवक्त्यानं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

    News18लोकमत
    News18लोकमत

    साधारण वर्षापूर्वी काही प्रकाशकांचे लेख अॅड-फ्री वाचता यावेत आणि अॅपमध्ये भिन्न रंगांचे होम स्क्रीन आयकॉन दिसण्याची सुविधा मिळावी, यासाठी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन लाँच करण्यात आलं होतं. एक सार्वजनिक कंपनी म्हणून ट्विटरच्या कमाईत सुरुवातीपासूनच जाहिरातींचा मोठा हिस्सा राहिला आहे. आता कंपनीच्या एकूण कमाईमध्ये अर्धा हिस्सा सबस्क्रिप्शनमधून मिळणाऱ्या रकमेचा असावा, यासाठी एलॉन मस्क प्रयत्न करत आहेत.

    एलॉन मस्क ट्विटरचे सर्वेसर्वा होऊन अवघे तीन दिवस झाले आहेत. तरी त्यांनी विविध बदल करण्यास सुरुवात केली आहे. लॉग-आउट केलेल्या युजर्ससाठी होमपेजमध्ये बदल करून त्यांनी आपलं काम सुरू केलं आहे. टेस्ला इंजिनीअर्सना ट्विटरमध्ये सल्लागार म्हणून आणण्याचा विचार ते करत आहेत. जेणेकरून ट्विटरमधील मीडल मॅनेजर्स आणि इंजिनीअर्सच्या संख्येत कपात करता येईल. या आठवड्यात कपात करण्‍यासाठी कर्मचार्‍यांच्या याद्या व्यवस्थापकांनी तयार केल्या आहेत. त्यामुळे लवकरच कर्मचारी कपात सुरू होईल, असा अंदाज आहे. मस्क यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध प्रोजेक्टवरील कर्मचारी जास्त वेळ काम करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात