मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter ची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद हे फीचर करणार बंद, Elon Musk देखील त्रस्त

Twitter ची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद हे फीचर करणार बंद, Elon Musk देखील त्रस्त

ट्विटरने फ्लिट फीचर (Fleets Feature) सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत असून, टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी या फीचरच्या बदल्यात नवी सुविधा सुरु करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 जुलै: कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) हे आजच्या काळातील महत्वाचे साधन बनले आहे. त्यात फेसबुक (Facebook), ट्विटरकडे (Twitter) युजर्सचा कल अधिक असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर (Indian Government Vs Twitter) हा वाद गेले काही दिवस चर्चेचा विषय बनला आहे. भारतातही ट्विटरमुळे अनेक वाद उदभवले आहेत. असे असून सुध्दा ट्विटर हे आजही एक प्रमुख समाज माध्यम म्हणून वापरले जाते. मात्र आता ट्विटरने फ्लिट फीचर (Fleets Feature) सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत असून, टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी या फीचरच्या बदल्यात नवी सुविधा सुरु करण्याची मागणी ट्विटरकडे केली आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने एक मोठी घोषणा केली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट (Micro Blogging Site) ट्विटर आता येत्या 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचरची सुविधा बंद करणार आहे. ट्विटरने ही फ्लिट फीचर सुविधा गतवर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये तपासणी तत्वावर सुरु केली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही सुविधा जागतिक स्तरावर सुरु करण्यात आली. या फीचरच्या माध्यमातून युजर आपले फोटो (Photo), व्हिडीओ (Video) पोस्ट करु शकत होते आणि हे फोटो, व्हिडीओ 24 तासांनंतर आपोआपच नाहीसे होत होते.

हे वाचा-मास्टरकार्डवरील RBI च्या कारवाईनंतर या बँकेकडून दिलासा; देणार VISA Credit Card

ट्विटर काय म्हणाले?

आम्ही 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचर सुविधा बंद करत आहोत, अशी माहिती ट्विटरने दिली आहे. याचे कारण स्पष्ट करताना या सोशल मिडीया कंपनीने सांगितले की आम्ही या फीचरच्या माध्यमातून युजर्स आकर्षित करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यावर खेद व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावरील सर्व युजर्ससाठी ही सेवा 8 महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीच हे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे.

एलन मस्क यांनी जॅक डोरसी यांना केली विनंती

फ्लिट फीचर बंद करण्याबाबतचे वृत्त येताच युजर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव्ह असणारे टेस्ला आणि स्पेसएक्सचे (SpaceX) मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे देखील या घोषणेमुळे अस्वस्थ झालो आहे असं ट्वीट केलं. त्यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसी (Jack Dorsey) यांच्याकडे या फिचरच्या बदल्यात नवी सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

First published:

Tags: Elon musk, Twiter, Twiter handle, Twitter, Twitter account