मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर

Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर

Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर

Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर

फेलिक्स क्रॉस नावाच्या एका अभियंत्यानं अलीकडेच खुलासा केला आहे की Instagram आणि Facebook मध्ये प्रत्येक खाजगी माहितीचे निरीक्षण करणारे इन-अ‍ॅप ब्राउझर आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट: आजकाल सोशल मीडिया (Social Media) हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपणं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सोशल मीडिया वापरत असतो. अनेकजण सकाळी उठल्याबरोबर फोनमध्ये सर्वप्रथम फेसबुक किंवा इन्स्टाग्राम उघडतात. सोशल मीडियामुळं तंत्रज्ञान नेहमीच संशयाच्या घेऱ्यात उभं असतं. सोशल मीडियावरून डेटा लीकेज (Data Leak on Social Media) ही मोठी समस्या बनली आहे. याचीच माहिती देणारा एक रिपोर्ट नुकताच समोर आला होता. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारखे अ‍ॅप्स देखील यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक करत आहेत. फेलिक्स क्राऊस नावाच्या एका अभियंत्याने नुकताच खुलासा केला की, Instagram आणि Facebook मध्ये In-App Browser आहे जे सर्व वैयक्तिक माहितीचं परीक्षण करतं. ही माहिती नंतर वापरली जाते. 10 ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या एका पोस्टद्वारे याचा खुलासा केला तेव्हा या इन-अ‍ॅप ब्राउझरवर वाद सुरू झाला. याबाबत युजर्सनी इन्स्टाग्राम आणि फेसबुककडूनही उत्तरे मागितली आहेत. असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो म्हणून यावेळी मेटाने यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केलं की, असं कोड्स त्यांच्या अ‍ॅप्समध्ये आढळून येतात. परंतु त्यासाठी आधी युजर्सची परवानगीही मागितली जाते, असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही माहिती मिळविण्यासाठी प्रथम वापरकर्त्याकडून परवानगी मागितली जाते. परवानगी मिळाल्यानंतरच त्याच्या क्लिकचा डेटा आणि इतर सर्व माहिती मिळवली जाते, असं मेटानं म्हटलं आहे. हेही वाचा- Smartphone Tips: स्मार्टफोन वापरताना कधीही करू नका या चुका; हातातच होईल ब्लास्ट आता प्रश्न असा आहे की मेटा असं का करत आहे? यामागे अनेक कारणं असू शकतात परंतु मुख्य कारणांपैकी एक म्हणजे डेटा हा मेटा च्या बिझनेस मॉडेलचा मुख्य स्त्रोत आहे. म्हणजेच कंपनी त्याच आधारावर वापरकर्त्यांसाठी पुढील गोष्टी उपलब्ध करून देते. तथापि वाद तृतीय पक्षाच्या वेबसाइट्सचाही आहे. केवळ मेटाच असं करत नसल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. अ‍ॅपल असो की गुगल प्रत्येकजण हे करत आहे. प्रत्येकाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा स्वतःचा ब्राउझर असतो.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Facebook, Instagram, Privacy leak

    पुढील बातम्या