Honda Activa 6G ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे आणि दर महिन्याला मोठ्या प्रमाणात विकली जाते. ही स्कूटर 109.51cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. स्कूटरची सध्या एक्स-शोरूम किंमत 72,400 ते 75,400 रुपये आहे.
या यादीतील दुसरी स्कूटर हीरो प्लेजर प्लस आहे. वजनानं हलकी असल्यानं महिलांसाठी ती उत्तम आहे. प्लेजर प्लस हे 110.9cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. Hero Pleasure Plus ची एक्स-शोरूम किंमत 66,768 ते 75,868 रुपये आहे.
TVS NTorq 125 ही स्पोर्टी स्कूटर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यात 124.8cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, थ्री-वॉल्व्ह, इंधन-इंजेक्ट इंजिन मिळतं. ही स्कूटर अधिक शक्तिशाली रेस XP लुकमध्ये देखील उपलब्ध आहे. TVS NTorq 125 ची एक्स-शोरूम किंमत 79,950 रुपये ते 99,960 रुपये आहे.
Suzuki Access 125 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम 125cc फॅमिली स्कूटरपैकी एक आहे. ही नो-नॉनसेन्स गियरलेस स्कूटर 124cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनसह येते. Suzuki Access 125 ची सध्याची किंमत 77,600 रुपये ते 87,200 रुपये एक्स-शोरूम आहे.
या यादीतील शेवटची स्कूटर Yamaha Aerox 155 आहे. मास-मार्केट विभागातील ही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महाग स्कूटर आहे. स्कूटरला 155cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते. त्याची एक्स-शोरूम किंमत सध्या 1.39 लाख रुपये ते 1.41 लाख रुपये आहे.