मुंबई, 17 ऑगस्ट: अलीकडचं जग हे टेक्नॉलॉजीचं जग आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध डिव्हाईसचा वापर करत असतो. स्मार्टफोन, लॅपटॉप या गोष्टीतर आपल्या जीवनाचा भागच बनून गेल्या आहेत. या डिव्हाइस चार्ज करण्यासाठी कंपन्या भिन्न प्रकारचे चार्जर देत असतात. पण विचार करा घरातील सर्व फिचर फोन, स्मार्टफोन तसेच लॅपटॉप इत्यादी चार्ज (Same Charger for smartphone and Laptop) करण्यासाठी एकच चार्जर असेल तर? भारतामध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉपसाठी एकाच प्रकारचा चार्जर वापरण्याबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो.
युरोपप्रमाणं सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी समान चार्जिंग पोर्ट असण्याचा पर्याय शोधण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या आणि उद्योग संघटना बुधवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्यांसह एक बैठक घेणार आहेत. तज्ञांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, परंतु फिचर फोन निर्मात्या कंपन्या आणि स्मार्टफोनमधील प्रमुख कंपनी Apple यांच्या खर्चामध्ये मोठी वाढ होईल. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सरकार लॅपटॉप, स्मार्टफोन, फिचर फोन आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उपकरणांसह सर्व मोबाइल उपकरणांमध्ये एकच चार्जिंग पोर्ट - USB Type-C - असण्याचा पर्याय शोधत आहे. बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी या हालचालीचे फायदे आणि तोटे सरकारसमोर स्पष्ट करतील.
अॅपलचे टेन्शन वाढू शकते:
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होईल, कारण त्यांना सध्या त्यांच्या मोबाईल उपकरणांसाठी विविध चार्जिंग केबल्स सोबत ठेवाव्या लागतात. लॅपटॉप, ऍपल डिव्हाइसेस आणि Android स्मार्टफोन्ससाठी वेगवेगळ्या चार्जिंग केबल्स असतात, ज्यामुळं डिव्हाइस चार्ज होत असताना ग्राहकांना वेगवेगळा चार्जर शोधावा लागतो.
बहुतेक Smartphones मध्ये उपलब्ध आहे USB Type-C:
सर्व प्रकारच्या डिव्हाइस निर्मात्यांना एक सामान्य मानक लागू करणं कठीण जाऊ शकतं. कारण प्रत्येकासाठी स्टँडर्ड भिन्न आहेत. या निर्णयाचा Android स्मार्टफोनवर फारसा परिणाम होणार नाही, कारण बहुतेक Android स्मार्टफोन चार्जिंगसाठी USB-C पोर्ट वापरतात.
तथापि, मायक्रो-USB वर अवलंबून असणारे फिचर फोन तसेच हाय-एंड गेमिंग लॅपटॉप यांमध्ये विविध प्रकारचे चार्जर वापरले जातात. डिव्हाईसनुसार त्यामधील चार्जर केबलमध्ये बदल केला जातो. तसेच IoT डिव्हाइसेस जे लीगेसी पोर्टवर अवलंबून असतात. त्यांच्यासाठी हे खूप कठीण जाणार आहे. कारण यामुळे उपकरणाच्या डिझाइनमध्येही बदल होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone