मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी पाळा हा नियम, अन्यथा होणार नाही संपर्क

आता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी पाळा हा नियम, अन्यथा होणार नाही संपर्क

आता देशात लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर (Mobile)कॉल करायचा असेल तर मोबाइल क्रमांकाआधी (0) शून्य (Zero Prefix) लावणं आवश्यक आहे.

आता देशात लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर (Mobile)कॉल करायचा असेल तर मोबाइल क्रमांकाआधी (0) शून्य (Zero Prefix) लावणं आवश्यक आहे.

आता देशात लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर (Mobile)कॉल करायचा असेल तर मोबाइल क्रमांकाआधी (0) शून्य (Zero Prefix) लावणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 16 जानेवारी: आता देशात लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर (Mobile)कॉल करायचा असेल तर मोबाइल क्रमांकाआधी (0) शून्य (Zero Prefix) लावणं आवश्यक आहे. दूरसंचार विभागानं (Telecom Department) याबाबतचा आदेश जारी केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा नवीन नियम तयार करण्यात आला होता, आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Operators) आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देणं सुरू केलं आहे.

दूरसंचार विभागानं (Telecom Department) लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर कॉल करण्यासाठी नंबर डायल करण्याच्या पद्धतीबद्दल (Dialing Pattern) 20 नोव्हेंबर 2020 रोजी एक आदेश जारी केला होता. फिक्स्ड लाइन आणि मोबाइल युजर्स यांना पुरेसे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध व्हावेत या हेतूनं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर 25 नोव्हेंबर रोजी दूरसंचार मंत्रालयानं (Ministry of Communication and Information Technology) एक परिपत्रक जारी करून त्यात 15 जानेवारीपासून देशात लँडलाइनवरून (Landline) मोबाइलवर कॉल करायचा असेल तर मोबाइल क्रमांकाआधी शून्य लावणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं होतं. यामुळं 2539 दशलक्ष क्रमांकांची मालिका निर्माण करण्यास मदत होणार आहे, असंही मंत्रालयानं नमूद केलं होतं.

ग्राहकांना सेवा पुरवठादार कंपन्यांकडून माहिती 

दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांना (Telecom Operators) आपल्या ग्राहकांना या नवीन नियमाची माहिती देणं अत्यावश्यक आहे. एखाद्या लँडलाइनधारकानं शून्य न लावता मोबाइलवर कॉल केला असेल, तर त्याला ही माहिती देणं आवश्यक आहे. त्यानुसार, मोबाइल ऑपरेटर्स एअरटेल आणि जिओ यांनी आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देणं सुरू केलं आहे. बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडियाही लवकरच याबाबत माहिती देण्यास सुरू करतील.

TRAI ने मे महिन्यात शिफारस केली होती 

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात ट्रायनं (TRAI) मे 2020 मध्ये लँडलाइनवरून मोबाइल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावण्याची सूचना केली होती. टेलीफोन क्रमांक वाढवण्यासाठी हा उपाय नसल्याचं ट्रायनं त्या वेळी म्हटलं होतं. या पद्धतीमुळे मोबाइल सेवांसाठी 2544 दशलक्ष नवीन क्रमांक उपलब्ध होतील, जे भविष्यातील गरज पूर्ण करतील, असंही ट्रायनं म्हटलं होतं.

First published:

Tags: Telecom