जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Jio च्या या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, मोफत मिळणार अनलिमिटेड Internet

Jio च्या या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, मोफत मिळणार अनलिमिटेड Internet

यात दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. तसंच Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं.

यात दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. तसंच Jio Apps चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं.

Reliance Jio ने ग्राहकांना खूश करण्यासाठी आता दोन दिवसांचा अनलिमिटेड डेटा पॅक (Unlimited data pack) देण्याची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : दोन दिवसांपूर्वी रात्री WhatsApp, Facebook, Instagram ची सेवा अचानक बंद झाली होती. या सर्व सेवांना जागतिक आउटेजचा सामना करावा लागला. जवळपास सहा तास या सेवा बंद होत्या. राउटर्समधील दोषपूर्ण कॉन्फिगरेशन बदलण्यासाठी हे आउटेज झाल्याचं कंपनीनं नंतर उघड केलं आणि वापरकर्त्यांची माफी देखील मागितली. त्यानंतर जिओ ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेटवर्क मिळत नसल्याचं समोर आलं. यानंतर Reliance Jio ने ग्राहकांना खूश करण्यासाठी आता दोन दिवसांचा अनलिमिटेड डेटा पॅक (Unlimited data pack) देण्याची घोषणा केली आहे. बुधवारी सकाळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील जिओ ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी (Internet connectivity) नेटवर्क मिळत नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर कंपनीनं एक निवेदन जारी केलं. काही ठिकाणी नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच कंपनीच्या टीमनं काही तासांतच या समस्येचं निराकरण केलं आहे. सध्या जिओच्या सर्व सेवा पूर्णपणे कार्यरत असल्याची माहिती या निवेदनात दिली आहे. यशिवाय झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीनं दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभावित ग्राहकांना दोन दिवसांचा अतिरिक्त अनलिमिटेड डेटा पॅक देण्याची घोषणा या निवेदनातून करण्यात आली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार देशभरातून आउटेजच्या (Jio outage) तक्रारी आल्या होत्या. मात्र, कंपनीच्या निवेदनात केवळ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कलमधील ग्राहकांनाच फटका बसल्याचं म्हटलं आहे. या आउटेजमागील कारणाचा अद्याप रिलायन्स जिओनं खुलासा केलेला नाही.

    पुन्हा FB-WhatsApp ठप्प झालं तर? हे आहेत Best पर्याय, नाही तुटणार जगाशी संपर्क

    दोन दिवसीय कॉम्प्लिमेंट्री अनलिमिटेड डेटा देण्यासाठी कंपनी आउटेजनं प्रभावित झालेल्या ग्राहकांना एक SMS पाठवणार आहे. त्यानंतर दोन दिवसांचा डेटा त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. सध्याचा अॅक्टिव प्लॅन संपल्यानंतर हा दोन दिवसांचा प्लॅन अॅक्टिव होईल. जर तुमच्याकडे सध्या एका महिन्याचा डेटा प्लॅन असेल तर तो संपल्यानंतर तुम्हाला आणखी दोन दिवस अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळेल. म्हणजेच एकूण 32 दिवसांची सेवा ग्राहकांना मिळेलं, असं रिलायन्स जिओ कंपनीनं सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात