Home /News /technology /

'या' कंपनीनं लाँच केली तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमतच नव्हे फीचर्ससुद्धा आहेत जबरदस्त

'या' कंपनीनं लाँच केली तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमतच नव्हे फीचर्ससुद्धा आहेत जबरदस्त

काळाच्या ओघात आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात बदल होतात. ऑटोमोबाईल उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Industry) सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. वाहनांसाठी लागणारं इंधन हे या बदलांमधील सर्वांत मोठं कारण आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 मे- :   काळाच्या ओघात आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात बदल होतात. ऑटोमोबाईल उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Industry) सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. वाहनांसाठी लागणारं इंधन हे या बदलांमधील सर्वांत मोठं कारण आहे. गेल्या कित्येक शतकांपासून आपण मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनावर (Fossil Fuels) विसंबून आहोत. आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर कुठेना कुठे इंधन ही गोष्ट परिणाम करते. आपल्या देशामध्ये सध्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel Price) प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या किमतींमुळे कार (Car) किंवा दुचाकी (Two-wheeler) चालवणंदेखील जास्त खर्चिक होत चाललं आहे. अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles) नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे नवीन स्टार्टअप (Start-ups) कंपन्यांसह अनेक मोठ्या वाहन निर्मिती कंपन्यांनीही (Automotive Companies) आपापल्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच करण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक टू व्हिलर निर्माता कंपनी असलेल्या बीगॉसनं (Bgauss) तर आपली तिसरी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. बीगॉसनं BG D15 ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणली आहे. ही नवीन गाडी पूर्वीच्या B8 आणि A2 या मॉडेलचं पुढील मॉडेल आहे. टाइम्स बुलनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बीगॉस BG D15 ही स्कूटर मेड इन इंडिया (Made in India) अंतर्गत पुण्यातील इन-हाउस रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमनं (In-house Research and Development Team) डिझाईन आणि डेव्हलप केली आहे. या स्कूटरमध्ये सेफ्टी फीचर्सची (Safety Features) पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. BG D15 स्कूटरमध्ये स्मार्ट बॅटरी (Smart Battery) आणि मोटर कंट्रोल सोबतच इतर अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. गाडीतील पूर्णपणे वॉटरप्रूफ असलेली ip67 रेटेड इलेक्ट्रिक मोटर अधिक सुरक्षा देते. ही लिथियम-आयन बॅटरी पाच तास 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते. 115 किमीची रेंज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरला रायडर आपला स्मार्टफोन कनेक्ट करून चार्जही करू शकतो. या स्कूटरमध्ये इको (Eco) आणि स्पोर्ट्स (Sports) असे एकूण दोन मोड (Mode) देण्यात आले आहेत. स्पोर्ट्स मोडबद्दल सांगायचं झालं तर, ही स्कूटर 7 सेकंदात स्पीड पकडू शकते आणि 60 किमी प्रतितास वेगाने प्रवास करू शकते. या इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या गाडीमध्ये 16-इंच ऑल-व्हील्स आहेत जे मागे बसलेल्या व्यक्तीला जास्त आरामदायी वाटतात. या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, या स्कूटरची किंमत 99 हजार 999 रुपये इतकी आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये (electric vehicle segment) अनेक घडामोडी होत आहेत. भविष्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचं ध्येय भारतानं ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवर बीगॉसच्या स्कूटर्सला चांगलं मार्केट मिळू शकतं.
    First published:

    Tags: Electric vehicles, Techonology

    पुढील बातम्या