Maruti, Mahindra आणि Tata सारख्या कंपन्या सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहेत. महिंद्रा येणाऱ्या दिवसांत पॉप्युलर XUV300 चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करणार आहे. या कारला 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 13 लाख रुपये असू शकते.
मारुती सर्वात पॉप्युलर हॅचबॅक कार WagonR चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करण्याची तयारी करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत जवळपास 8 लाखांपर्यंत असू शकते.
टाटा मोटर्सने 89th Geneva International Motor शोमध्ये आपल्या H2X मायक्रो एसयूवीचं इलेक्ट्रिक वेरिएंट प्रदर्शित केलं होतं. टाटा ही कार भारतात लवकरच लाँच करण्याची योजना आखत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.
टाटा आणखी एका सर्वात पॉप्युलर हॅचबॅक कार Altroz चं इलेक्ट्रिक वेरिएंट लाँच करू शकते. या कारची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये lithium-ion battery चा वापर करण्यात आला आहे, जो या कारला सिंगल चार्जमध्ये 250 ते 300 किमीपर्यंतची रेंज देईल.
महिंद्राने 2020 फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली होती. महिंद्रा eKUV100 या कारला भारतात लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8 लाख 25 हजार रुपयांच्या आसपास असेल. ही कार सिंगल चार्जमध्ये 130 ते 150 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.