नवी दिल्ली, 19 मार्च : Apple iPhone SE 2022 आणि iPad Air 2022 आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही नव्या उत्पादनांनी काही आठवड्यांपूर्वी झालेल्या अॅपल (Apple) स्प्रिंट इव्हेंटद्वारे बाजारपेठेत पदार्पण केलं होतं. आता ही दोन्ही डिव्हाईस भारतात ऑनलाईन तसंच ऑफलाईन खरेदी करता येणार आहेत. आयफोन SE 2022 या मॉडेलचं डिझाईन जुन्या डिव्हाईसप्रमाणेच असलं तरी युजरला टॉप-एंड परफॉर्मन्स मिळावा आणि 5G नेटवर्कला सपोर्टसाठी या फोनमध्ये लेटेस्ट A15 बायोनिक चिपसेट (Bionic Chipset) वापरण्यात आला आहे. iPad Air 2022 चा लूक सारखाच दिसत असला तरी त्यात M1 चिपसेट देण्यात आलेला आहे. त्यामुळे याची क्षमता iPad Pro आणि MacBook सारखीच आहे. अॅपल Apple iPhone SE 2022 आणि iPad Air 2022 ची भारतातली किंमत, ऑफर्स भारतात Apple iPhone SE 2022 ची किंमत 43,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 64GB स्टोरेजच्या बेस मॉडेलची आहे. याशिवाय या फोनचे 128 GB आणि 256 GB व्हेरियंट (Variant) देखील उपलब्ध असून, त्याची किंमत अनुक्रमे 48,900 आणि 58,900 रुपये आहे. सेल ऑफरमध्ये हा फोन तुम्ही आयसीआयसीआय बँक, कोटक बँक किंवा एसबीआय कार्ड वापरुन खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला 2000 रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट (Discount) मिळेल. तसेच या फोनच्या खरेदीसाठी विशेष नो-कॉस्ट ईएमआय स्किम (No Cost EMI Scheme) आणि एक्सचेंज ऑफर्सही उपलब्ध आहेत. वाचा : हवा तितका AC वापरुनही येईल कंट्रोलमध्ये वीज बिल, या 4 Tips मुळे होईल पैशांची बचत Apple iPad Air 2022 ची किंमत 54,900 रुपयांपासून सुरू होते. वायफायसह 64GB व्हेरियंटची ही किंमत आहे. या आयपॅडच्या 256GB मॉडेलची किंमत 68,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे या आयपॅडचे 64GB आणि 256 GB स्टोरोज ऑप्शनमधले वाय-फाय (Wi-Fi) आणि सेल्युलर मॉडेल (Cellular Model) अनुक्रमे 68,900 आणि 82,900 रुपयांना उपलब्ध आहेत. आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक आणि एसबीआय कार्ड वापरून खरेदीदार या आयपॅडवर 4000 रुपयांचे विशेष कॅशबॅक डिस्काउंट मिळवू शकतात. Apple iPhone SE 2022 ची वैशिष्ट्ये Apple iPhone SE 2022 मध्ये खालच्या बाजूला टच आयडी असलेला 4.7 इंचाचा HD रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेटसह 4GB RAM असून 64GB,128GB आणि 256GB असे स्टोरेजचे (Storage) पर्याय उपलब्ध आहेत. हा फोन iOS 15.4 यापेक्षा अधिक व्हर्जनवर ऑपरेट होतो. या फोनमध्ये सिंगल 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फेसटाईमसाठी देण्यात आलेला आहे. वाचा : Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात? काय आहे एका दिवसाचं लिमिट Apple iPad Air 2022 ची वैशिष्ट्ये iPad Air 2022 मध्ये 10.9 इंचाचा एलईडी लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला असून, तो 2340×1640 पिक्सेल रिझोल्यूशनसाठी सपोर्ट करतो. या आयपॅडमध्ये M1 चीपसह iPadOS सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. यात अॅपलने सेंटरस्टेजला सपोर्ट करणारा 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड कॅमेरा फ्रंटला दिला आहे. मागील व्हर्जनप्रमाणेच 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देखील यात आहे. iPad Air 2022 64GB आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, ते वायफाय किंवा वायफाय+सेल्युलर मॉडेलसह जोडता येतात. या आयपॅडसोबत चार्जिंग करण्यासाठी युएसबी टाईप सी (USB Type C) इंटरफेस मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.