मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

देशातील सर्वाधिक रस्ते अपघातामागे हे आहे कारण; मृतांमध्ये पायी चालणाऱ्यांची संख्या मोठी

देशातील सर्वाधिक रस्ते अपघातामागे हे आहे कारण; मृतांमध्ये पायी चालणाऱ्यांची संख्या मोठी

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वार्षिक रस्ते अपघात रिपोर्टमध्ये, भारतात रस्ते अपघातामागील मुख्य कारणाचा खुलासा केला आहे. भारतात 2019 मध्ये झालेल्या अधिकतर रस्ते अपघातांमागे, वाहनांचा ओव्हर स्पीड हे प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्रान्सपोर्ट रिसर्च विंगद्वारा जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये भारतात 4,49,002 रस्ते अपघातात 4,51,361 जण जखमी झाले, तर 1,51,113 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात दरदिवशी 1230 रस्ते अपघात होतात. ज्यात 414 जणांचा रोज मृत्यू होतो. तर प्रत्येक तासाला 51 अपघात आणि 17 जणांचा मृत्यू होतो.

ओव्हर स्पीड -

रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूमागे, ओव्हर-स्पीडिंग हे प्रमुख कारण आहे. ज्यात 67.3 टक्के 1,01,699 मृत्यू, 71 टक्के अपघात आणि 72.4 टक्के जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा - 107 वर्षांनंतर दिसला हा अनोखा सरडा; सोशल मीडियावर VIDEO VIRAL)

अवैध लायसन्स -

एकूण अपघातांपैकी 15 टक्के अपघात अवैध लायसन्ससह गाडी चालवणं किंवा गाडी न शिकलेल्या ड्रायव्हर्समुळे झाले असल्याचं, म्हटलं आहे. 2019 मध्ये खड्ड्यांमुळे रस्ते अपघातात 2140 जणांच्या मृत्यूसह, या मृतांच्या आकड्यात 6.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरी भागात 32.9 टक्के तर ग्रामीण भागात 61.7 टक्के मृत्यू झाले आहेत.

मृतांमध्ये पायी चालणाऱ्यांची संख्या अधिक -

रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्यांची संख्या 2018 मध्ये 22,656 होती, तर 2019 मध्ये त्यात वाढ झाली असून ही संख्या 25,858 वर पोहचली आहे. म्हणजेच यात जवळपास 14.13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

(वाचा - Whatsapp Pay in India : अशाप्रकारे तुम्ही देखील बनवा खातं, व्यवहार करणं अधिक सुलभ)

ओव्हरलोड -

जवळपास 10 टक्के मृत्यू आणि एकूण अपघातांच्या 8 टक्के भाग वाहनांमधील ओव्हरलोडमुळे झाल्याचं समोर आलं आहे. 69,621 प्रकरणं हिट अँड रन म्हणून दाखल करण्यात आली आहेत. ज्यात 29,354 मृत्यू आणि 61,751 जखमी झाले आहेत. 2018 च्या तुलनेत हिट अँड रन केसमध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच हिट अँड रनमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येतही 0.5 टक्के वाढ झाली आहे.

First published:

Tags: Road accidents