मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जबरदस्त! सुपरमॅनसारखं हवेतं उडण्याचं स्वप्न होणार साकार, त्यासाठी लागेल 'हा' खास सूट

जबरदस्त! सुपरमॅनसारखं हवेतं उडण्याचं स्वप्न होणार साकार, त्यासाठी लागेल 'हा' खास सूट

फोटो

फोटो

तुम्ही टीव्हीवर सुपरमॅनला हवेत उडताना पाहिलं असेल, किंवा मराठी चित्रपट ‘जबरदस्त’मध्ये एक सूट घातल्यानंतर हवेत उडणारा हिरो पाहिला असेल; पण आता विमान किंवा हेलिकॉप्टरशिवाय हवेत उडण्याचं स्वप्न पूर्ण करून तुम्हीही बनू शकता सुपरमॅन!

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 1ऑक्टोबर-   तुम्ही टीव्हीवर सुपरमॅनला हवेत उडताना पाहिलं असेल, किंवा मराठी चित्रपट ‘जबरदस्त’मध्ये एक सूट घातल्यानंतर हवेत उडणारा हिरो पाहिला असेल; पण आता विमान किंवा हेलिकॉप्टरशिवाय हवेत उडण्याचं स्वप्न पूर्ण करून तुम्हीही बनू शकता सुपरमॅन! फक्त त्यासाठी गरज आहे ती खास ‘जेट सूट’ खरेदी करण्याची, जो लंडनच्या बाजारात दाखल झालाय. हा सूट रिचर्ड ब्राउनिंगने तयार केला आहे. तो घातल्यानंतर कशा प्रकारे हवेत उडता येतं, याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्याने दाखवलं. पण या सूटची किंमत ही तब्बल 4 लाख डॉलर आहे. ‘द वॉशिंगटन पोस्ट’ने या बाबत वृत्त दिलंय.

युनायटेड किंगडमच्या एक मानवयुक्त फ्लाइट स्टार्ट-अप असणाऱ्या ‘ग्रॅव्हिटी’ या कंपनीनं गेल्या आठवड्यात अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या एका व्यापारी मेळाव्यात या जेट सूटचं प्रात्यक्षिक दाखवलं. पाठीवर पट्ट्या बांधून हा सूट घालवा लागतो, व तो गॅस टर्बाइन इंजिनवर चालतो. कंपनीचे संस्थापक रिचर्ड ब्राउनिंग यांनी हा सूट घालून कन्व्हेन्शन सेंटरजवळील जमिनीच्या गवताळ भागावर जवळपास 10 ते 15 फूट उंच हवेत उड्डाण केलं. सध्या कंपनी हे सूटचं मॉडेल मुख्यतः कॉर्पोरेट आणि लष्करासाठी तयार करत असून ते त्यांनाच विकण्यात येईल. म्हणजे सामान्य माणसांसाठी त्याची विक्री होणार नाही. तसंच या सूटची काही तासांसाठी चाचणी घेण्यासाठी तब्बल 3,000 डॉलर खर्च येतो. यासाठी कंपनीनं निधी मिळवला आहे, आणि विशेष लष्करी युनिट्ससोबत भागीदारी सुरू केली आहे. याबाबत ब्राउनिंग म्हणाले, ‘भविष्यात माणसं असा प्रवास करतील असं सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का ? आम्ही जे प्रत्यक्ष करून दाखवलं आहे त्यातून तुम्ही एखाद्या Sci-Fi चित्रपटाप्रमाणेच प्रेरणा घेऊ शकता.’

सूट बनवणाऱ्या मोजक्याच कंपन्या

जेटपॅकसह उड्डाण करण्याचं स्वप्न किमान "द जेटसन" इतकं जुनं असलं तरी, गेल्या शतकात हे तंत्रज्ञान विकसित झालं आहे. ग्रॅव्हिटी आणि जेट पॅक एव्हिएशनसारख्या मोजक्याच कंपन्या हे उत्पादन बाजारात विकत आहेत. जेट पॅक एव्हिएशनने त्याच्या वेबसाइटवर या उत्पादनाची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु, दक्षिण कॅलिफोर्नियामधील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची किंमत सुमारे 5,000 डॉलर आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा व्यापकपणे अवलंब केल्यास कोणत्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल, हे अद्याप स्पष्ट नाही. काही तज्ज्ञांच्या मते, हे उत्पादन डिलिव्हरी ड्रोन, उदाहरणार्थ लॉजिस्टिक नेटवर्कचा एक मोठा भाग होऊ शकत नाही. कारण याचा वापर करण्यासाठी जटिल नियम आहेत. तर, ग्रॅव्हिटी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की, ‘ते कोणत्याही विमानचालन श्रेणीमध्ये येत नाही, त्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही. परंतु ते नियमांना धरून काम करतात.’ याशिवाय जेट पॅक एव्हिएशनने त्यांच्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, ‘त्यांची (जेट सूटची) सर्व उत्पादनं अमेरिका उड्डाणं फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे मंजूर केलेली आहेत.’

2017 मध्ये सुरू झाली ग्रॅव्हिटी कंपनी

ब्राउनिंग यांनी लंडनजवळ 2017 मध्ये ग्रॅव्हिटी कंपनी सुरू केली, आणि त्यासाठी अॅडम आणि टिम ड्रॅपर यांच्याकडून 650,000 डॉलर मिळवले. जे चिनी इंटरनेट कंपनी बायडू (Baidu) तसंच टेस्ला (Tesla) आणि स्काइप (Skype) मध्ये सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी ओळखले जाणारे उद्यम भांडवलदार आहेत. ग्रॅव्हिटीने त्यांच्या जेटपॅक डिझाइनमध्ये बदल केला असून, जवळपास1,000 3डी-प्रिंटेड जेट सूट तयार केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार सूट पाच गॅस टर्बाइन जेट इंजिनद्वारे संचलित केला जातो. जी सुमारे 1,000 हॉर्स पॉवर निर्माण करतात. याचं इंधनासह वजन सुमारे 75 पाउंड आहे. जेट सूट इंधन, डिझेल किंवा रॉकेलवर चालू शकतो. हा सूट घालून आकाशात उडताना हाताद्वारे जेट सूट नियंत्रित करता येऊ शकतो. प्रतितास 80 मैल वेगाने आणि तांत्रिकदृष्ट्या जमिनीपासून 12,000 फूट उंचीवर हा सूट घालून उडता येतं. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने जेटपॅकची कमी उंचीवर चाचणी करण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.

(हे वाचा:कारमध्ये सीट बेल्ट लावले नाहीत तर एयर बॅग्सही वाचवणार नाहीत जीव! हे आहे कारण )

कंपनीने जेट सूटचा इलेक्ट्रिक टाइपसुद्धा तयार केला आहे, जो मार्चमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. याबाबत ब्राउनिंग म्हणाले की, ‘हा इलेक्ट्रिक टाइपमधील सूट चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या बॅटरी खूप जड आहेत, आणि तो सूट घालून उडणं अवघड होतं.’कंपनीने जगभरातील विविध कार्यक्रमांमध्ये हा सूट प्रदर्शित केला आहे. यामध्ये बेझोसने आयोजित केलेल्या मार्स कॉन्फरन्स आणि जपानमधील बेसबॉल सीझनच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. पैसं कमवणं हा त्यामागे उद्देश आहे. ‘ग्रॅव्हिटीचं उत्पन्न या वर्षी सुमारे 5 मिलियन डॉलर असेल, आणि त्यात नफा हा सुमारे 500,000 डॉलर असेल,’ असं ब्राउनिंग यांनी सांगितलं. परंतु, हा सूट लवकरच सार्वजनिक डोमेनमध्ये येण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. युद्ध क्षेत्रातील परिस्थितींमध्ये सैनिकांना मदत करण्यासाठी जेट सूट कसा वापरता येऊ शकतो, यादृष्टीनेही कंपनीचे काम सुरू आहे.दरम्यान, सध्या या जेट सूटची किंमत खूप जास्त असून सर्वसामान्यांना तो सहजासहजी उपलब्ध होणार नसला तरी येणाऱ्या काळात हवेमध्ये विमान किंवा हेलिकॉप्टरशिवाय एकट्या व्यक्तीला हवेत उडता येईल, हे मात्र स्पष्ट होतंय.

First published:

Tags: Technology, Viral