जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कारमध्ये सीट बेल्ट लावले नाहीत तर एयर बॅग्सही वाचवणार नाहीत जीव! हे आहे कारण

कारमध्ये सीट बेल्ट लावले नाहीत तर एयर बॅग्सही वाचवणार नाहीत जीव! हे आहे कारण

कारमध्ये सीट बेल्ट लावले नाहीत तर एयर बॅग्सही वाचवणार नाहीत जीव! हे आहे कारण

सुरक्षेच्या दृष्टीने कार चालवताना सीट बेल्ट वापरणंही अनिवार्य आहे. पण अनेकदा या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 27 सप्टेंबर : अनेकदा रस्त्यांवर होणार्‍या अपघातांबद्दल आपण ऐकतोच. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटणं, ब्रेक फेल होणं यामुळे खूप अपघात होतात. रस्त्यावर वाहन चालवताना नियम पाळणं गरजेचं असतं. यासाठीच रस्ते-वाहतूक कायदे अस्तित्वात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कार चालवताना सीट बेल्ट वापरणंही अनिवार्य आहे. पण अनेकदा या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात. परिणामी, अपघातात मृत्यू किंवा दुखापत होते. पण सीट बेल्ट न लावल्यास संकटसमयी एअर बॅग्जही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. हे कसं याबद्दलची माहिती घेऊयात.

    अनेकजण गाडी चालवताना सीट बेल्ट लावत नाहीत; पण अपघातासमयी गाडीतील एअर बॅग्जही तुमचा जीव वाचवणार नाहीत. कारण सीट बेल्ट लावला नसेल तर एअर बॅग्ज अपघातप्रसंगी बाहेरच येणार नाहीत. एअर बॅग्ज या अपघातासमयी तुमचा जीव वाचवतात. त्यामुळे जीवीतहानी टळते. पण त्यासाठी सीटबेल्ट वापरणं बंधनकारक आहे. केवळ एअर बॅग्ज जीव वाचवू शकतात हा गैरसमज आहे. काही प्रवासी याच समजामुळे सीट बेल्ट लावतच नाहीत. फक्त एअर बॅग्ज असल्याच्या भरवश्यावर राहतात. गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती दगावल्या. त्यामुळे वाहन सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. यावर उपाय म्हणून भारत सरकारने जानेवारी महिन्यात नोटिफिकेशन काढलं होतं. सरकारने म्हटलं होतं की, प्रवासी गाड्यांमध्ये 6 एअर बॅग असणं अनिवार्य आहे. यासाठीची मुदत 1 ऑक्टोबरपर्यंत आहे. पण डेडलाईन जवळ येतेय. त्यामुळे नियमाची अंमलबजावणी कदाचित लांबणीवर पडू शकते. तसंच भारत सरकार हा नियम बंधनकारक करणार नाही, असंही दिसतंय.

    टाटा मोटर्सने सीट बेल्ट वापराबाबत आणि कारमध्ये बसण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. टाटा मोटर्सकडून असं सांगण्यात आलं की, विविध क्रॅश टेस्ट घेतल्यावरच प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गाडीचं एकंदर स्वरूप ठरवण्यात येतं. यासाठीच सीट बेल्टचा वापर आणि कारमध्ये बसण्याच्या पद्धतीबद्दल माहिती जाणून घेणं गरजेच आहे.

    हे 8 नियम लक्षात ठेवा.

    1. कार चालवताना सीट बेल्ट वापरणं हे आपल्या प्राथमिक सुरक्षेसाठी गरजेचं आहे.

    2. एअर बॅग ही सुरक्षिततेच्या प्राधान्यक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण सीट बेल्ट लावला नसेल तर केवळ एअर बॅग तुमचा जीव वाचवणार नाहीत.

    3. सीट बेल्टचा उपयोग केवळ लांबपल्ल्यासाठीच्या प्रवासासाठी करायचा नाही, तर छोट्या अंतरासाठीही वापरणं गरजेचं आहे.

    4. स्टिअरिंग व्हिलपासून तुमचं शरीर थोडं दूर असणं आवश्यक. सीटवर बसून पुढे न वाकता आरामात बसा.

    5. अपघातानंतर एअर बॅग, स्टिअरिंग व्हिल आणि वायरिंग हार्नेस एकदातरी जरूर बदलावं.

    6. प्रवासात कधीही क्रॅश किंवा साईड बार लावू नका. कारण अपघाताच्या वेळेस तुमची गाडी सुरक्षित राहील पण एअर बॅग उघडायला त्यामुळे वेळ लागेल किंवा इतर सहप्रवाशांचा जीव धोक्यात येईल.

    7. ड्रायव्हरसहित सहप्रवाशांसाठी हेडरेस्ट गरजेचं आहे. हेडरेस्टची जागा चुकली किंवा हललेली असेल तर अपघातात मानेचं हाड मोडू शकतं.

    8. कोणत्याही वजनाला हलक्या किंवा कलंडणार्‍या गोष्टी कारमध्ये ठेवू नयेत. जेणेकरून अपघातासमयी त्या तुमच्या अंगावर पडणार नाहीत.

    9. कारने प्रवास करताना लहान मुलांनाही सीट बेल्ट वापराचं महत्त्च पटवून द्यायला हवं.

    जानेवारीतील नोटिफिकेशन

    रस्ते-वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये वाहन सुरक्षेबाबत अध्यादेश काढला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2022 नंतर बनलेल्या एम1 कॅटेगरीतल्या सगळ्या कार्समध्ये 6 एअर बॅग्ज असणं गरजेचं आहे. तसंच एम1 कॅटेगरीतल्या कार्समध्ये दोन्ही बाजूला टोर्सो एअर बॅग्ज आणि दोन साईड कर्टन/ट्यूब एअरबॅग्ज असणं बंधनकारक आहे. याशिवाय दोन फ्रंट एअर बॅग्जही असणं गरजेचं आहे. अशाप्रकारे एकूणात 6 एअर बॅग्ज कारमध्ये असण्याची योजना केली आहे.

    वाहन-सुरक्षेच्या चर्चांना आलं उधाण

    काही दिवसांपूर्वीच टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्रींचा कार अपघातात मृत्यू झाला. तपासात आढळून आलंय, की त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. यामुळे देशभरात कार सुरक्षेवरून चर्चांना उधाण आलं.

    प्रवास सुखकर करायचा असेल तर सीट बेल्ट नक्की वापरा. सीट बेल्ट वापरल्यास जीवितहानी नक्कीच होणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात