मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /गुगल अर्थच्या अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जनवर लवकरच येणार टाईम मशीन फिचर?

गुगल अर्थच्या अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जनवर लवकरच येणार टाईम मशीन फिचर?

सॅटेलाइट इमेजेस फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये हवामान अंदाज पाहताना दिसायच्या, त्यातही भारताचा नकाशा दिसायचा. पण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतोय हे पाहून सगळेच आनंदले होते.

सॅटेलाइट इमेजेस फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये हवामान अंदाज पाहताना दिसायच्या, त्यातही भारताचा नकाशा दिसायचा. पण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतोय हे पाहून सगळेच आनंदले होते.

सॅटेलाइट इमेजेस फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये हवामान अंदाज पाहताना दिसायच्या, त्यातही भारताचा नकाशा दिसायचा. पण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतोय हे पाहून सगळेच आनंदले होते.

  नवी दिल्ली, 17 मार्च:  सॅटेलाइट इमेजेस फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये हवामान अंदाज पाहताना दिसायच्या. त्यातही भारताचा नकाशा दिसायचा. पण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतोय हे पाहून सगळेच आनंदले होते. तुम्हीही गुगल अर्थ वापरत असालच, पण आता गुगलने त्यात एक नवं फीचर अ‍ॅड केलंय आणि ते पण तुम्हाला आवडेल.

  जर तुम्ही गुगल अर्थ डेस्कटॉप व्हर्जन (Google Earth Desktop Version) वापरत असाल, तर आपण डेडिकेटेड डेस्कटॉप प्रोग्रामविषयीच चर्चा करीत आहोत. ज्याला गुगल अर्थ प्रो असं म्हणलं जातं. यामध्ये अनेक सुविधा दिल्या जातात. या सुविधा अद्याप गुगल अर्थच्या मोबाईल किंवा वेब व्हर्जनवर उपलब्ध झालेल्या नाहीत. गुगल अर्थच्या वेब आणि मोबाईल या दोन्ही प्रकारांमध्ये टाईम मशीन फिचरची कमतरता निश्चितच जाणवते.

  या मशीन आधारे तुम्हाला भूतकाळातील जुन्या सॅटेलाईट इमेजस पाहता येतात. एक्सडीएक्सच्या अहवालानुसार, एक चांगली बाब अशी आहे की हे फिचर लवकरच गुगल अर्थच्या अँड्रॉइड व्हर्जनवर परत आणलं जाऊ शकतं.

  या अहवालानुसार, ही सुविधा गुगल अर्थ अ‍ॅपमध्ये (Google Earth App) उपलब्ध आहे. गुगल अर्थ टाईम मशीन सुविधा प्रायोगिक फिचर तत्वावर उपलब्ध आहे. त्यामुळे ही सुविधा अ‍ॅक्सेस करण्याची किंवा वापरण्याची कोणतीही सोपी पद्धत सध्या उपलब्ध नाही. परंतु, वास्तविकपणे तुम्ही जर गुगल अर्थ टाईम मशीन (Google Earth Time Machine) सुविधा वापरु इच्छित असाल तर तुम्हाला एक रुटेड फोन वापरावाच लागेल. या व्यतरिक्त तुम्हाला तुमच्या अ‍ॅप प्रेफरन्सला रुट एक्सप्लोरर (Route Explorer) आणि टर्मिनल कमांडच्या (Terminal Command) माध्यमातून मॅन्युअली मॉडीफाईड (Manually Modified) करावं लागेल.

  (हे वाचा: Facebook वर तुमचं प्रोफाईल कोणी चेक केलं? असं घ्या जाणून)

  टाईम मशीन फिचरविषयी बोलायचं झालं तर या माध्यमातून तुम्ही 1920-1930 मधील जुन्या किंवा पुरातन स्थळांची छायाचित्रे पाहू शकता. हे फक्त सॅनफ्रॅन्सिकोसाठीच उपलब्ध आहे. या व्यतरिक्त यात वैशिष्ठ्यपूर्ण अशी टाईम लॅप्स सुविधा देण्यात आली आहे. यामुळे तुम्ही गुगल सर्व्हरवरील डिपॉजिटरीमध्ये उपलब्ध असलेली जुनी छायाचित्रे पाहू शकता. अहवालानुसार, काही ठिकाणांसाठी मोठ्या उपग्रहांची कमतरता असल्याने तुम्हाला अमेरिकेबाहेरील ठिकाणे पाहताना अडचणी येतील. ही सुविधा अ‍ॅप फ्लॅग (App Flag) स्वरुपात उपलब्ध आहे, म्हणूनच ते अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅपच्या स्थिर व्हर्जनसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकते.

  https://hindi.news18.com/news/tech/google-earth-soon-to-add-time-machine-feature-to-android-app-may-take-you-go-back-in-time-aaaq-3519450.html

  First published:

  Tags: Technology