मुंबई, 22 नोव्हेंबर: व्हॉट्सअॅप हे जगात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. हे अॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालंय. मित्र-मैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यासह अनेकांची ऑफिसची कामंही व्हॉट्सअॅपवरून होतात. व्हॉट्सअॅपचा वापर श्रीमंत असो वा गरीब सगळेच करतात. हे अॅप मोठ्या प्रमाणात वापरलं जात असल्याने अनेक सायबर गुन्हेगार याच्या माध्यमातून लोकांची फसवणूकही करतात. स्कॅमर्स आणि हॅकर्स व्हॉट्सअॅपवर लक्ष ठेवून असतात. या अॅपमध्ये आपल्या प्रायव्हसीची काळजी घेतली जाते आणि चॅट्स एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड असतात. पण तरीही तुम्हाला वाटत असेल की कुणीतरी तुमचं व्हॉट्सअॅप चॅट वाचतंय. तर तुम्ही त्याबद्दल माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला कंपनीचं एक फीचर वापरावं लागेल. आपलं चॅट कुणी वाचतंय का, याबद्दलची माहिती कशी घ्यायची ते सविस्तर जाणून घेऊयात. व्हॉट्सअॅप लिंक फीचर वापरून इतर डिव्हाइसमध्येही व्हॉट्सअॅपवर चॅट करता येतं. असं करून युजर प्रायमरी व्हॉट्सअॅपच्या चॅट्स वाचू शकतो. हेच काम स्कॅमर्स करतात, ते व्हॉट्सअॅप लिंक फीचरच्या मदतीने युजरच्या व्हॉट्सअॅप चॅटचा अॅक्सेस घेतात व तुमच्या पर्सनल चॅट्स वाचतात. पण याचा शोध युजरला घेता येऊ शकतो. त्याची पद्धतही खूप सोपी आहे. सर्वांत आधी तुमचं व्हॉट्सअॅप ओपन करा, नंतर टॉप लेफ्टला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. हेही वाचा: Netflix अकाउंट तुमचं अन् मजा दुसरं कुणीतरी घेतंय? असं करा Remove इथे तुम्हाला Linked Devices नावाचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटशी लिंक केलेल्या डिव्हाइसची यादी दिसेल. यामध्ये जर तुम्हाला एखादं अनोळखी डिव्हाईस किंवा ब्राउझर दिसत असेल तर तिथून तुम्ही ते हटवू शकता. यासाठी तुम्हाला त्या डिव्हाईस किंवा ब्राउझरवर क्लिक करून रिमूव्हच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. असं केल्याने तुमचं दुसऱ्या डिव्हाईसशी लिंक असलेलं व्हॉट्सअॅप अनलिंक होईल आणि दुसऱ्या अकाउंटचा अॅक्सेस पण काढेल. पण तुम्हाला जास्त सिक्युरिटी हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपला इनबिल्ट अॅप लॉकने लॉक ठेवू शकता. तसंच तुम्ही टू-फॅक्टर सिक्युरिटी कोडचा वापरही करू शकता.
अशा रितीने तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. जेणेकरून कुणालाही तुमची चॅट व मेसेजेस वाचता येणार नाहीत. कारण बऱ्याचदा अशा रितीने चॅट्स वाचून ब्लॅकमेलिंगसारखे प्रकारही घडतात, ज्यामुळे युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो.