जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone वाचवेल तुमचा जीव! अपघात झाला तर थेट इमरजन्सी नंबरवर कॉल

Smartphone वाचवेल तुमचा जीव! अपघात झाला तर थेट इमरजन्सी नंबरवर कॉल

Smartphone वाचवेल तुमचा जीव! अपघात झाला तर थेट इमरजन्सी नंबरवर कॉल

सध्याच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) अत्यावश्यक बनला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनवर अनेक अ‍ॅप्स (Apps) वापरू शकता, तसंच महत्त्वाची कामं करू शकता. स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सेवा-सुविधा मिळतात.

    मुंबई, 1 जुलै : सध्याच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) अत्यावश्यक बनला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनवर अनेक अ‍ॅप्स (Apps) वापरू शकता, तसंच महत्त्वाची कामं करू शकता. स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक सेवा-सुविधा मिळतात. अगदी आपत्कालीन परिस्थितीतही स्मार्टफोनमुळे तत्काळ मदत मिळू शकते. अ‍ॅपलची (Apple) SOS सुविधा याबाबतीत खूप लोकप्रिय आहे. सध्या गुगल पिक्सेल (Google Pixel) या स्मार्टफोनमधली कार क्रॅश डिटेक्शन (Car Crash Detection) सुरक्षा सुविधा विशेष चर्चेत आहे. अपघात होताच या सुविधेच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला जातो. केवळ गुगल पिक्सेलवर उपलब्ध असलेली ही सुविधा लवकर पिक्सेलव्यतिरिक्त अन्य अँड्रॉइड (Android) स्मार्टफोन्सवर मिळू शकते. एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांपर्यंत तातडीनं मदत पोहोचणं गरजेचं असतं. अ‍ॅपलचा आयफोन (iphone) आणि अ‍ॅपल स्मार्टवॉचच्या (Apple Smartwatch) माध्यमातून अनेक अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवल्यानं त्यांचे प्राण वाचल्याचं आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. गुगल पिक्सेल स्मार्टफोनमध्ये कार क्रॅश डिटेक्शन नावाचं एक फीचर आहे. आता हे फीचर पिक्सेलव्यतिरिक्त अन्य अँड्रॉइड फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गुगलच्या नवीन पर्सनल सेफ्टी अ‍ॅपमध्ये कोडची एक नवीन स्ट्रिंग दिसून आली आहे. त्यानुसार गुगल काही नवीन सुरक्षा सुविधा किंवा फीचर इतर अँड्रॉइड फोन्सकरिता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं दिसतं. त्यामुळे आगामी काळात अँड्रॉइड फोनमध्ये कार क्रॅश डिटेक्शन फीचरसोबत क्रायसिस अलर्ट (Crisis Alert) आणि सेफ्टी चेक (Safety Check) फीचर मिळू शकतं. 9to5Googleने APK टीअरडाउनद्वारे अन्य अँड्रॉइड डिव्हाइसेसवर कार क्रॅश डिटेक्शन फीचरचा विस्तार व्यक्तिगत सुरक्षा अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनच्या चाचणीद्वारे केल्याचं दिसून आलं आहे. या सुविधेसाठी काही परवानग्या आवश्यक असतात. त्यामुळे कंपनी पिक्सेलव्यतिरिक्त अन्य अँड्रॉइड फोनमध्ये ही सुविधा कशा पद्धतीनं देणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गुगल प्ले (Google Play) सर्व्हिसेसच्या माध्यमातून व्यक्तिगत संरक्षण सुविधा दिल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कार क्रॅश डिटेक्शन आणि अन्य नव्या सुरक्षा सुविधा सुरुवातीला नेमक्या कोणत्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सना मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पर्सनल सेफ्टी अ‍ॅप व्हर्जन 2022.05.25 गुगल प्लेवर उपलब्ध आहे. संबंधित प्रकाशकानं नॉन पिक्सेल फोनचा संदर्भ देऊन कोडच्या स्ट्रिंग्ज शेअर केल्या आहेत. त्यावरून कदाचित गुगल पिक्सेलव्यतिरिक्त अन्य स्मार्टफोन्ससाठी सुरक्षा फीचर्स उपलब्ध करून देऊ शकतं, असं दिसतं. अहवालानुसार, गुगलने काही ठिकाणी `पिक्सेल` ऐवजी `तुमचं डिव्हाइस` असा बदल कोडमध्ये केला आहे. याशिवाय क्रायसिस अलर्ट आणि सेफ्टी चेक यांसारखी जी फीचर्स पिक्सेलवर उपलब्ध आहेत, ती अन्य अँड्रॉइड फोन्सवरही मिळणार आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात