Home /News /technology /

व्हॉईस कॉलिंग सपोर्टसह जबरदस्त Smartwatch लाँच, सिंगल चार्जमध्ये मिळेल 18 दिवसांचा बॅटरी बॅकअप

व्हॉईस कॉलिंग सपोर्टसह जबरदस्त Smartwatch लाँच, सिंगल चार्जमध्ये मिळेल 18 दिवसांचा बॅटरी बॅकअप

टेक्नोलॉजी कंपनी जियोनीने (Gionee) भारतीय बाजारपेठेत 3 नवी स्मार्टवॉच नुकतीच लॉन्च केली आहेत.

नवी दिल्ली, 13 जून: देशात स्मार्टवॉचची (Smart Watch) मागणी वाढत आहेत. टेक्नोलॉजी कंपनी जियोनीने (Gionee) भारतीय बाजारपेठेत 3 नवी स्मार्टवॉच नुकतीच लॉन्च केली आहेत. यात Stylfit GSW6, Stylfit GSW7 आणि Stylfit GSW 8 या मॉडेल्सचा समावेश आहे. जियोनीची ही स्मार्टवॉच आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड (Android) अशा दोन्ही डिव्हाईसला पेअर (Pair) होऊ शकतात. या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस आणि हार्ट मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Stylfit GSW7 वगळता अन्य दोन स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथसह व्हॉईस कॉलिंगची (Voice Calling) सुविधा देण्यात आली आहे. Gionee Stylfit GSW6 ची वैशिष्ट्यं - जियोनीच्या या स्मार्टवॉचमध्ये चौकोनी आकाराचा डिस्प्ले (Square Display) देण्यात आला आहे. या डिस्प्लेसाठी कव्हर्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. या माध्यमातून युजर व्हॉईस कॉलिंग आणि म्युझिक अॅक्सेस (Access) करू शकतात. या स्मार्टवॉचमध्ये एक मायक्रोफोन आणि इन-बिल्ट स्पीकर देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 220mAhची बॅटरी असेल. सिंगल चार्ज नंतर ही बॅटरी 15 दिवसांपर्यंत बॅकअप (Backup) देऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. यात Spo2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि 40 पेक्षा अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. Gionee Stylfit GSW7 - जियोनीच्या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंची गोल डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट रेटींगसह आहे. हे रेटींग फिटनेस मोडला सपोर्ट करतं. हे स्मार्टवॉच युजर आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट करु शकतात. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये 130 mAhची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज नंतर ही बॅटरी 4 दिवसांपर्यंत बॅकअप देऊ शकेल. या स्मार्टवॉचला ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आलेला नाही.

(वाचा - आता Facebook Messenger द्वारे पेमेंटही करता येणार,जाणून घ्या 3 नवे भन्नाट फीचर्स)

Gionee Stylfit GSW8 ची वैशिष्ट्ये - हे स्मार्टवॉच गोलाकार शेपमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये दमदार 300 mAhची बॅटरी दिली असून, सिंगल चार्जनंतर युजरला 18 दिवसांपर्यंत बॅकअप मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये खास महिलांसाठी सायकल ट्रॅकिंग, कॅलरी काऊंटर तसंच इतर काही वैशिष्टपूर्ण फीचर्स देण्यात आले आहेत.

(वाचा - Google काही सेकंदात सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? यामागे काय असते प्रोसेस)

स्मार्टवॉचची किंमत काय? Gionee Stylfit GSW7 स्मार्टवॉचची किंमत भारतात 3999 रुपये आहे. जियोनी Stylfit GSW6 ची किंमत 6999 रुपये, तर Stylfit GSW8 या स्मार्टवॉचची किंमत 8999 रुपये आहे. 13 जून पासून इंट्रोडक्टरी ऑफर नुसार Stylfit GSW7 हे स्मार्टवॉच ग्राहक फ्लिपकार्टवर (Flipkart) केवळ 2099 रुपयांत खरेदी करु शकतात.
Published by:Karishma Bhurke
First published:

Tags: Smartwatch, Smartwatch features

पुढील बातम्या