मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जबरदस्त डिस्प्ले अन् कडक लूक; Oneplus Nord स्मार्टवॉचचा नादच खुळा

जबरदस्त डिस्प्ले अन् कडक लूक; Oneplus Nord स्मार्टवॉचचा नादच खुळा

जबरदस्त डिस्प्ले अन् कडक लूक; Oneplus Nord स्मार्टवॉचचा नादच खुळा

जबरदस्त डिस्प्ले अन् कडक लूक; Oneplus Nord स्मार्टवॉचचा नादच खुळा

वनप्लस कंपनीने नॉर्ड ब्रँडसह बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. जे ग्राहक कमी किमतीचे चायनीज स्मार्टफोन वापरतात, त्यांना नॉर्ड ब्रँडिंगच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न वनप्लसने केला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 17 डिसेंबर:  बाजारात स्मार्टफोनप्रमाणेच विविध कंपन्यांची खास फीचर्स असलेली स्मार्टवॉचेस लाँच होत असतात. ग्राहकांची मागणी आणि गरजा विचारात घेऊन कंपन्या स्मार्टवॉचेसच्या फीचर्समध्ये बदल किंवा सुधारणा करत असतात. विशेषतः फिटनेसची आवड असलेले ग्राहक स्मार्टवॉचचा आवर्जून वापर करतात. नवीन स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण वनप्लस कंपनीने नॉर्ड ब्रँडसह बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. जे ग्राहक कमी किमतीचे चायनीज स्मार्टफोन वापरतात, त्यांना नॉर्ड ब्रँडिंगच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न वनप्लसने केला आहे. त्याचप्रमाणे वनप्लसने स्मार्टवॉच सेगमेंटबाबतदेखील हीच पद्धत वापरली आहे. या तंत्राचा एक भाग म्हणून कंपनीने वनप्लस नॉर्ड वॉच लाँच केलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये असलेल्या खास फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

  वनप्लस कंपनीने नुकतंच नॉर्ड वॉच लाँच केलं आहे.या स्मार्टवॉचचा डिस्प्ले मोठा असल्याने त्याला स्मार्टवॉचऐवजी फिटनेस बँड म्हणणं उचित ठरेल. वनप्लस नॉर्ड वॉचच्या डिझाईनमध्ये फारसं नावीन्य जाणवणार नाही. याची डायल रेक्टँग्युलर मिळेल. वॉचची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. स्मार्टवॉचच्या निर्मितीत वनप्लस कंपनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. स्ट्रॅपही दर्जेदार आहे. त्यामुळे वॉच घालणं आरामदायी होईल. यावर असलेलं एक डिझाइन लक्ष वेधणारं आहे. वॉचच्या बेल्टवर वनप्लस नॉर्डचं ब्रँडिंगही पाहायला मिळेल. हे स्मार्टवॉच हातात घातल्यावर फारसं वजनदार वाटत नाही. या वॉचला मेटल फिनिश आहे. एकूणच या स्मार्टवॉचची बिल्ड क्वालिटी चांगली असून, प्रीमियम वॉचसारखा अनुभव यातून मिळेल.

  हेही वाचा: 1 जानेवारीपासून बदलणार बँकाशी संबंधित ‘हा’ नियम, तुमच्यावर काय होणार परिणाम?

  या स्मार्टवॉचचं बॅटरी लाइफ उत्तम आहे. या रिव्ह्यूमध्ये आम्हाला बॅटरी हा या स्मार्टवॉचमधला सर्वोत्तम पार्ट असल्याचं जाणवलं. सिंगल चार्जिंगमध्ये तुम्ही हे वॉच 4 ते 5 दिवस आरामात वापरू शकता. अर्थात हे 4 ते 5 दिवस तुम्ही अगदी 24 तास हे स्मार्टवॉच वापरू शकता. अगदी नॉर्मल यूझचा विचार करायचा झाला तर तुम्ही आठवडाभर हे वॉच चार्जिंग न करता वापरू शकता. या स्मार्टवॉचची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे एक तास लागतो.

  परफॉर्मन्सचा विचार करता या वॉचमध्ये तुम्हाला फार वेगळं काही मिळणार नाही. एका फिटनेस बँडमध्ये जी फीचर्स असतात, ती तुम्हाला या वॉचमध्ये मिळतील. परंतु, या वॉचमध्ये नेमकी आवश्यक फीचर्स देण्यात आलेली नाहीत. यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर देण्यात आलेलं नाही. याचा अर्थ तुम्हाला फोनवर आलेल्या कॉल्सचं फक्त नोटिफिकेशन या वॉचवर दिसेल. तुम्ही वॉचवरून कॉल्स डिस्कनेक्ट करू शकता. कॉल रिसीव्ह करण्याचा कोणताही ऑप्शन नाही. याशिवाय तुम्हाला अन्य मेसेजेसची नोटिफिकेशन्स मिळतील. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंगशी संबंधित कोणतीही फीचर्स देण्यात आलेली नाहीत.

  वनप्लस नॉर्ड स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकिंगशी संबंधित सर्व फीचर्स मिळतात. यात अनेक ट्रॅकिंग मोड्सही देण्यात आले आहेत. हार्ट रेट, SpO2 आणि इतर उपयुक्त बाबींचे मॉनिटर्स या वॉचमध्ये आहेत. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर वनप्लसचं N Health हे अॅप डाउनलोड करावं लागेल. स्लीप ट्रॅकिंगचं फीचरदेखील चांगलं काम करतं.

  नॉर्ड वॉचमध्ये तुम्हाला 1.78 इंच आकाराचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेत 500 Nitsचा पीक ब्राइटनेस मिळतो. ही सर्व फीचर्स तुम्हाला केवळ ऑन पेपर नाही तर प्रत्यक्षातही मिळतात. यात काही त्रुटीही आहेत. स्मार्टवॉचच्या डिस्प्लेमध्ये काही आव्हानात्मक गोष्टी दिसून आल्या. कंपनी या स्मार्टवॉचचा डिस्प्ले AMOLED आहे, असं सांगत असली तरी जितका हवा तितका ब्राइट नाही. या बजेट रेंजमध्ये तुम्हाला यापेक्षा चांगला डिस्प्ले मिळू शकतो. या वॉचमध्ये टच रिस्पॉन्स चांगला आहे.

  वनप्लस नॉर्ड वॉचमध्ये अ‍ॅव्हरेज डिस्प्ले आणि दमदार बॅटरी आहे. यात चांगले सेन्सर आहेत. स्टेप काउंट असो अथवा SpO2 सेन्सर, याचे रिझल्ट अगदी अचूक दिसतात. कोणत्याही स्मार्टवॉचसाठी आवश्यक असलेलं ब्लूटूथ कॉलिंग फीचर यात दिलेलं नाही. या व्यतिरिक्त अन्य सर्व आवश्यक फीचर्स या वॉचमध्ये आहेत. नोटिफिकेशन, फिटनेस ट्रॅकिंग आदी फीचर्स यात मिळतात. त्याचप्रमाणे यात तुम्हाला वॉच फेस ऑप्शनही मिळतो. या स्मार्टवॉचची किंमत 4999 रुपये आहे. हे वॉच डीप ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक अशा दोन कलर्समध्ये उपलब्ध आहे. एकूणच वनप्लस नॉर्ड वॉच हा एक चांगला पर्याय आहे; मात्र त्याची किंमत जास्त वाटते. एक ब्रँड म्हणून तुम्ही यावर पैसे खर्च करू शकता; पण रिअलमी वॉच 3 प्रो याच बजेटमध्ये उपलब्ध असून, त्यात अधिक चांगली फीचर्स देण्यात आली आहेत. रेटिंगचा विचार करता याला 10 पैकी 8.5 रेटिंग देता येईल.

  First published:

  Tags: Smartwatch