मुंबई, 17 डिसेंबर: जर तुमचं बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकर ग्राहकांसाठी नियम बदलणार आहेत. ग्राहकांनी लक्षात ठेवावं की त्यांनी नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी केली आहे. नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. पंजाब नॅशनल बँक (PNB) सारख्या बँका देखील त्यांच्या ग्राहकांना याबद्दल एसएमएसद्वारे माहिती देत आहेत. पीएनबी ग्राहकांना मिळालेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर एग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी लागू केला जाणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून लॉकरशी संबंधित कोणते नवीन नियम लागू होणार आहेत ते जाणून घेऊया. लॉकर एक्सेसबद्दल एसएमएस आणि ईमेल सूचना- लॉकरमध्ये अनधिकृत एक्सेस केल्यास दिवस संपण्यापूर्वी बँका ग्राहकांचा नोंदणीकृत मेल एड्रेस आणि मोबाइल क्रमांक तारीख, वेळ आणि काही आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देतील. हेही वाचा: आता घर घेताना येणार नाकीनऊ, या’ मोठ्या बँकेचं Home Loan पुन्हा महागलं या स्थितीत बँका ग्राहकांना देणार पैसे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या नवीन मानकानुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरच्या कोणत्याही वस्तूंचं नुकसान झाल्यास, बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. आरबीआयच्या अधिसूचनेमध्ये असं म्हटलं आहे की, येथील सुरक्षा लक्षात घेऊन सर्व पावलं उचलणं ही बँकांची जबाबदारी आहे. नोटिफिकेशननुसार, बँकेतील कोणतीही कमतरता किंवा निष्काळजीपणामुळे आग, चोरी, दरोडा यासारख्या घटना घडू नयेत याची काळजी घेणं ही बँकांची जबाबदारी आहे. या प्रकरणांमध्ये बँक नुकसानभरपाई देणार नाही- भूकंप, पूर, वादळ इत्यादी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील सामग्रीचं नुकसान झाल्यास, बँक त्याची भरपाई करण्यास जबाबदार राहणार नाही. याशिवाय, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर ग्राहकाच्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर बँक ग्राहकांना कोणतेही पैसे देणार नाही. दुसरीकडे, अशा आपत्तींपासून बँकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, लॉकर सिस्टमशी संबंधित काही खबरदारी घ्यावी लागेल.
खातेदाराचा मृत्यू झाल्यास काय होते? नवीन नियमांनुसार, लॉकरच्या मालकाने एखाद्याला नॉमिनेट केले तर बँकांना त्याला वस्तू काढण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल. मृत्यू प्रमाणपत्राची पडताळणी आणि व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी केल्यानंतर हे केले जाऊ शकते.