मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नाही तर आता विद्यार्थ्यांना करायचंय ऑफ-बिट करिअर; वाचा संपूर्ण माहिती

इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नाही तर आता विद्यार्थ्यांना करायचंय ऑफ-बिट करिअर; वाचा संपूर्ण माहिती

ऑफ-बिट करिअर (Offbeat Careers) नेमकं आहेत तरी काय? याबद्दल आम्ही आज संपूर्ण माहिती देणार आहोत.

ऑफ-बिट करिअर (Offbeat Careers) नेमकं आहेत तरी काय? याबद्दल आम्ही आज संपूर्ण माहिती देणार आहोत.

ऑफ-बिट करिअर (Offbeat Careers) नेमकं आहेत तरी काय? याबद्दल आम्ही आज संपूर्ण माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 11 ऑगस्ट: दहावी आणि बारावीनंतर (10th and 12th) पुढील शिक्षणासाठी कोणतं क्षेत्र निवडणार? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर असतो. अनेक विद्यार्थी याच उत्तर इंजिनिअरिंग (Engineering) किंवा मेडिकल (Medical) असं देतात. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर चांगलाच जॉब मिळतो आणि पगारही भरघोस (High Salary Jobs) मिळतो असा पालकांचा समाज असतो म्हणून पालक विद्यार्थ्यांना  इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यास सांगतात. मात्र आता हळूहळू हा ट्रेंड कमी होऊ लागला आहे. विद्यार्थी ऑफ-बिट करिअरकडे (Off Beat Career options) वळू लागले आहेत. मात्र ऑफ-बिट करिअर (Offbeat Careers) नेमकं आहेत तरी काय? याबद्दल आम्ही आज संपूर्ण माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

ऑफ-बिट करिअर म्हणजे काय?

अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मुभा देण्यात येते त्यामुळे ते आपल्या मनाप्रमाणे करिअर निवडू शकतात. इंजिनिअरिंग आणि मेडिकलशिवाय दुसरा जगावेगळा करिअरचा मार्ग म्हणजेच ऑफ-बिट करिअर. अनेक विद्यार्थी ऑफ-बिट करिअरमध्ये भरघोस पैसे मिळवतात. तसंच त्यांच्या मनासारखं आणि आवडतं काम करायला मिळाल्यामुळे समाधानही मिळतं.

हे वाचा - शाळेची घंटा पुन्हा वाजणार; मुलांना शाळेत पाठवताना पालकांनो अशी घ्या काळजी

ऑफ-बिट करिअर निवडताना या गोष्टी ठेवा लक्षात

करिअर सल्लागारांच्या म्हणण्यानुसार, आजच्या काळात दहापैकी दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या छंदाशी संबंधित अभ्यासक्रम करण्यात रस आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑफ-बिट करिअर निवडत आहेत.

ज्यांना उमेदवारांना आपलं कंफर्ट झोन सोडायचं नाही, मग ती त्यांची पहिली कॉर्पोरेट नोकरी असो किंवा कौटुंबिक व्यवसाय असो, त्यामध्येही बरेच कोर्स ऑनलाईन उपलब्ध आहेत जे सहज पूर्ण केले जाऊ शकतात.

एका संशोधनानुसार, सोशल मीडिया मॅनेजमेंट, गेम डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग हे करिअर सध्या आघाडीवर आहेत, त्यापैकी काही प्रोफेशनल्सच्या मागणीमध्ये 400% पर्यंत वाढ दिसून आली आहे.

ऑफ-बिट करिअर कसं बनवावं?

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना त्यांच्या आवडीबद्दल सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या क्षेत्रात रस आहे हे पालकांना माहिती असणं आवश्यक आहे. त्यानुसार ऑफ-बिट करिअर निवडताना पालकांची सहमती मिळू शकेल. तसंच ऑफ-बिट करिअर निवडताना आवडीच्या क्षेत्रात नोकरीची संधी आहे का किंवा त्यामधून समाधान मिळू शकेल का? हा विचार विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Career opportunities, Education, Jobs