मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Corona ची लागण झालेल्या रुग्णांसाठी Spicejet ची ऑफर, असा घेता येणार फायदा

Corona ची लागण झालेल्या रुग्णांसाठी Spicejet ची ऑफर, असा घेता येणार फायदा

Spicejet ने कोविड झालेल्या रुग्णांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे प्रवासाची (Rescheduling Flight) तारीख बदलता येणार आहे.

Spicejet ने कोविड झालेल्या रुग्णांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे प्रवासाची (Rescheduling Flight) तारीख बदलता येणार आहे.

Spicejet ने कोविड झालेल्या रुग्णांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे प्रवासाची (Rescheduling Flight) तारीख बदलता येणार आहे.

  नवी दिल्ली, 14 जुलै: कोविडच्या (Covid) काळात बऱ्याच लोकांना लॉकडाउन (Lockdown), सतत निर्बंधामध्ये होणारे बदल आणि आरोग्याविषयक समस्या यामुळे कुठे प्रवास करायचा असेलं तर त्यादृष्टीनं नियोजन करणं अवघड जातं. त्यामुळे ऐनवेळी नियोजनामध्ये बदल करावा लागतो, प्रवास रद्दही करावा लागतो. Spicejet ने प्रवाशांच्या अशा अनेक गोष्टी लक्षात घेता एक सुविधा आणली आहे. जर Spicejet ने प्रवास करणार असाल, विमानाचं तिकीटही बुक केलेलं असेल आणि याचदरम्यान जर तुम्हाला कोविड झाला, तर तुमच्या तिकिटाचा एक रुपयाही वाया जाणार नाही. कारण Spicejet ने कोविड झालेल्या रुग्णांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे प्रवासाची (Rescheduling Flight) तारीख बदलता येणार आहे.

  Spicejet कडून कोविड बाधित प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी स्पाईसजेटच्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं आहे आणि प्रवास करण्यापूर्वी त्यांचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरद्वारे अगोदर बुक केलेल्या तारखेशिवाय उपलब्ध इतर कोणत्याही दिवसाच्या फ्लाइटचं तिकीट बुक करता येईल. यासाठी प्रवाशाला कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. मात्र त्यावेळी तिकीट दरांमध्ये जर वाढ झालेली असेल तर अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. प्रवासी या ऑफरचा 15 जुलै 2021 पर्यंतचं लाभ घेऊ शकतील.

  (वाचा - Electric Vehicle पॉलिसचे मिळणार मोठे फायदे, वाहन खरेदीनंतर मिळेल बंपर इन्सेटिव्ह)

  Spicejet ने दिलेली ऑफर फक्त डोमेस्टिक (Domestic) प्रवासासाठी लागू आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अशी ऑफर देण्यात आलेली नाही. तसंच एकाच पीएनआर (PNR) द्वारे एकापेक्षा जास्त व्यक्तींची तिकिटं बुक केली असतील तर केवळ कोविड झालेल्या व्यक्तीलाचं या ऑफरचा लाभ घेता येईल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना free.change@spicejet.com यावर ईमेल करावा लागेल. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रं सबमिट करावी लागतील.

  (वाचा - ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता RTO टेस्टच नाही; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल)

  यापूर्वी देखील Spicejet ने अशाप्रकाची ऑफर दिलेली होती. तेव्हा मात्र सर्वच प्रवाशांना तिकीट रिशेड्यूल (Reschedule) करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी ग्राहकांकडून कोणताच अतिरिक्त चार्ज आकारण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा अशाप्रकारची ऑफर देऊन Spicejet ने कोविड रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Spicejet