मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत कोरोनाव्हायरस तर नाही ना? खास डिव्हाइस तुम्हाला करणार अलर्ट

तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत कोरोनाव्हायरस तर नाही ना? खास डिव्हाइस तुम्हाला करणार अलर्ट

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू (Corona Virus) आहे का हे तपासण्यासाठी, तसंच या विषाणूंना नष्ट करण्यासाठी अशी दोन नवी उपकरणं (Device) विकसित करण्यात आली आहेत.

  नवी दिल्ली, 09 जुलै :  कोरोनाव्हायरस (Coronavirus) फक्त डोळ्यांनी तर आपल्याला दिसत नाही. पण तो आपल्या आजूबाजूच्या पृष्ठभागावर आणि हवेत (Coronavirus in air) असू शकतो. जेव्हा तो आपल्या शरीरात जातो तेव्हा चाचणी करून आपल्या शरीरात कोरोना आहे, याचं निदान होतं. पण आता तुमच्या आजूबाजूच्या हवेत कोरोना आहे की नाही, हेसुद्धा समजणार आहे. इतकंच नव्हे तर विषाणूंचा खात्माही करणार आहे, अशी दोन उपकरणं (Coronavirus detecting devices) भारतीय तज्ज्ञांनी विकसित केली आहेत.

  केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेच्या (CSIO) चंडीगड इथल्या प्रयोगशाळेने एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू (Corona Virus) आहेत का हे तपासण्यासाठी, तसंच या विषाणूंना नष्ट करण्यासाठी अशी दोन नवी उपकरणं (Device) विकसित केली आहेत. यापैकी एक एअर सॅम्पलर (Air Sampler) असून, दुसऱ्या उपकरणाचं नाव एअर प्युरिफायर (Air Purifier) असं आहे. हे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर (Ultra Violet Lamp) आधारित आहे. ही उपकरणं घर, शाळा, ऑफिसेस, मॉल, तसंच मोठ्या हॉलमध्ये बसवता येऊ शकतात.

  एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू अस्तित्वात आहे की नाही, याची तपासणी करणाऱ्या उपकरणाचं नाव पॅन सीएसआयआर एअर सॅम्पलर असं आहे. या छोट्याशा उपकरणात एअर कॉम्प्रेसर बसवण्यात आला आहे. हा कॉम्प्रेसर (Compressor) हवा आत खेचतो. त्याच्या आतल्या बाजूला एक मेम्ब्रेन आहे. त्यावर हवेतले कोरोना विषाणू जमा होतात. वीज आणि बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. हे उपकरण बाजारात आणण्यासाठी सीएसआयआरने 5 कंपन्यांसोबत भागीदारीही केली आहे.

  हे वाचा - लस घेतल्यानंतरही मास्क घालायला टाळाटाळ करू नका : अजित पवार

  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) निर्देशक जितेंद्र जे. जाधव यांनी याबाबत सांगितलं, की एअर सॅम्पलर जाळीच्या माध्यमातून हवा आत खेचून घेतो. यातल्या मेंम्ब्रेनवर हवेतून येणारे सूक्ष्मकण चिटकतात. मेम्ब्रेनवर सूक्ष्म कणांमध्ये विषाणूंचा समावेश नाही हे संध्याकाळी लॅबमध्ये जाऊन तपासणं आवश्यक आहे. त्यात विषाणू आढळून आला, तर हे उपकरण ज्या ठिकाणी लावलं होतं, तेथील लोकांना अलर्ट करणं सोपं जाणार आहे.

  विकसित करण्यात आलेलं दुसरं तंत्र आहे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित एअर प्युरिफायरचं. त्यात बसवण्यात आलेल्या अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पमध्ये बसवण्यात आलेली ट्यूब विषाणूंना नष्ट करते. हे अतिनील दिवे सप्लाय डक्टमध्येच कापून फिट केले जातात. एअर प्युरिफायर हा बंदिस्त खोलीत एसी हवा खेळती ठेवतो. डक्टिंग सिस्टीममध्ये जेव्हा हवा परत जाते तेव्हा यूव्ही लाइटच्या (UV Light) माध्यमातून एअर प्युरिफायर हवा पूर्णतः स्वच्छ करतो. यामुळे खोलीत विषाणू न जाता केवळ शुद्ध हवा पोहोचते. हे उपकरण सध्या रेल्वेतले काही कोच, एसी बस, ऑडिटोरियम, सीएसआयआरच्या काही कार्यालयांमध्ये बसवता येऊ शकतात. याची किंमत ठिकाणानुसार 3 हजारांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत असेल.

  हे वाचा - एका कोरोनाव्हायरसची कितीतरी रूपं; नेमकं समजतं तरी कसं हा नवा Corona variant?

  केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या म्हणण्यानुसार, ही उपकरणं येत्या काळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Coronavirus, Technology