मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नवीन स्मार्टफोन घेताय? 'या' गोष्टी तपासून मगच करा खरेदी अन्यथा होईल नुकसान

नवीन स्मार्टफोन घेताय? 'या' गोष्टी तपासून मगच करा खरेदी अन्यथा होईल नुकसान

नवीन स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी, कॅमेरा यासह त्याचा प्रोसेसर, त्याचा डिस्प्ले यावरही लक्ष द्या. यामुळेतुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा स्मार्टफोन खरेदी करणं सोपं होईल

नवीन स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी, कॅमेरा यासह त्याचा प्रोसेसर, त्याचा डिस्प्ले यावरही लक्ष द्या. यामुळेतुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा स्मार्टफोन खरेदी करणं सोपं होईल

नवीन स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी, कॅमेरा यासह त्याचा प्रोसेसर, त्याचा डिस्प्ले यावरही लक्ष द्या. यामुळेतुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा स्मार्टफोन खरेदी करणं सोपं होईल

  नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: आजकाल मोबाईलविना (Mobile use) जगणं ही अगदी अशक्यकोटीतील बाब झाली आहे. त्यातही साधे मोबाईल नाही तर स्मार्टफोन (Smart phone) वापराचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग, उत्तम कॅमेरा आणि अन्य अनेक सुविधा मिळत असल्यानं अगदी ऑफिसची कामंही त्यावरून करता येणं शक्य असतं. त्यामुळे स्मार्टफोनची मागणी मोठी असते. परिणामी उत्पादक कंपन्याही नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन्स बाजारात आणत असतात. त्यामुळे स्पर्धात्मक किंमतीत ग्राहकांना स्मार्टफोन्स उपलब्ध होतात. एकच फोन दीर्घकाळ वापरण्यापेक्षा नवीन आलेला स्मार्टफोन आवडला तर जुना देऊन नवीन फोन घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. सध्याही बाजारपेठेत अनेक नवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. त्यामुळे तुम्हीही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या बाबींकडे आवर्जून लक्ष द्या.

  बॅटरी आणि कॅमेरा महत्त्वाचे घटक

  स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहकवर्ग सर्वाधिक प्राधान्य कॅमेरा (Camera) आणि बॅटरीला (Battery) देतात. कारण आजकाल कॅमेऱ्यांची जागा स्मार्टफोननं घेतली आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करताना तुमची फोटो काढण्याची आवड आणि गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने योग्य कॅमेरा त्या स्मार्टफोनमध्ये आहे का याची खात्री करा. स्मार्टफोनचा मोठा ग्राहकवर्ग असलेल्या तरुणाईत सेल्फीचे वेड अधिक असते, त्यामुळे सेल्फीसाठी खास कॅमेरे दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या फोनमध्ये तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे कॅमेरे आहेत का याची तपासणी करा मगच फोन खरेदी करा.

  हे वाचा-VIDEO: पाण्यात बुडवलं, त्यावरून कारही चालवली; 'या' स्मार्टफोनला काहीच झालं नाही

  त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बॅटरी. आपण बहुतांश वेळ आपल्या स्मार्टफोनवर अवलंबून असतो. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या वापरामुळे स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ चालणारी असणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या कामांसाठी स्मार्टफोनचा वापर होत असल्यानं फोनची बॅटरी सलग वापरानंतरही दीर्घ काळ टिकणारी असणं गरजेचं आहे. याकरता स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी किमान 4000mAh क्षमतेची असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.

  प्रोसेसर तपासा

  याबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक तपासण्यास विसरू नये तो म्हणजे स्मार्टफोनचा प्रोसेसर (Mobile Processor) . स्मार्टफोन वेगवान असणं अतिशय गरजेचं असतं. तो वारंवार हँग होत असेल तर खूप अडचणी येतात, त्यामुळे वेगवान स्मार्टफोनसाठी त्याचा प्रोसेसर उत्तम दर्जाचा असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जो अँड्रॉईड Android स्मार्टफोन खरेदी करणार आहात, त्याचा प्रोसेसर Qualcomm Snapdragon 730G आणि 865पर्यंतच्या क्षमतेचा आहे, याची खात्री करा.

  हे वाचा-दुसऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओद्वारे YouTubeवर लाखो कमावतात लोक,पाहा काय आहे ट्रिक

  याही गोष्टी विसरू नका...

  स्मार्टफोन फोनची रचना आणि गुणवत्ताही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं स्मार्टफोन खरेदी करताना त्याची बॉडी काचेची नसून प्लास्टिकची असावी यावर भर द्या. जेणेकरून फोन तुटण्याचा, फुटण्याचा धोका कमी होईल. तसेच, फोनच्या डिस्प्लेच्या काचेला चांगलं संरक्षण आहे, याचीही खात्री करून घ्या.

  तेव्हा नवीन स्मार्टफोन घेताना त्याची बॅटरी, कॅमेरा यासह त्याचा प्रोसेसर, त्याचा डिस्प्ले यावरही लक्ष द्या. यामुळेतुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा स्मार्टफोन खरेदी करणं सोपं होईल.

  First published:

  Tags: Smartphone, Smartphones