मराठी बातम्या /बातम्या /देश /जगात Monkeypox च्या वाढत्या धोक्यानंतर भारत सरकार Alert मोडवर मार्गदर्शक तत्त्वे जारी

जगात Monkeypox च्या वाढत्या धोक्यानंतर भारत सरकार Alert मोडवर मार्गदर्शक तत्त्वे जारी

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare) मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत.

नवी दिल्ली, 01 जून: जगात मंकीपॉक्सचा (Monkeypox)धोका वाढत चालला आहे. हा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare) मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. आत्तापर्यंत भारतात या आजाराचे एकही रुग्ण आढळलेले नाही. मात्र तरी ही खबरदारीच्या पातळीवर कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सरकारला नको आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आफ्रिकन वन्य प्राण्यांचे मांस खाणे किंवा शिजवणे तसंच आफ्रिकन वन्य प्राण्यांपासून बनविलेले क्रीम, लोशन आणि पावडर यासारख्या उत्पादनांचा वापर करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला आहे.

Breaking News: KK च्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि मार्गदर्शक तत्त्वांद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केलं आहे. याशिवाय त्वचेवर जखमा किंवा गुप्तांगात जखमा असलेल्या आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळण्याचा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे. आजारी व्यक्तींनी वापरलेले कपडे, अंथरूण किंवा आरोग्य संस्थांमध्ये वापरलेले साहित्य किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या लोकांनी सावध राहावं, असं मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे.

विशेषत: ज्या देशांतून मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रभावित देशांमध्ये गेल्या 21 दिवसांत प्रवास केलेल्या लोकांच्या प्रवासाचा तपशील तपासला पाहिजे.

जगभरातील देशांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरणे आढळून आल्यानं येत्या काळात भारतातही रुग्ण आढळल्यास त्या वेळी परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याची तयारी सुरू असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार, प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच मंकीपॉक्सचे प्रकरण निश्चित मानले जाईल. यासाठी केवळ पीसीआर किंवा डीएनए चाचणीची पद्धत वैध असेल. या प्रकरणात, रोग आणि त्याची लक्षणे याबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

त्यात असं नमूद केलं आहे की संशयित प्रकरण आढळल्यास, त्याचा नमुना राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये बनवलेल्या इंटीग्रेटेड डिजीज सर्विलांस प्रोग्रामच्या नेटवर्कद्वारे पुण्यातील ICMR-NIV च्या शीर्ष प्रयोगशाळेत पाठविला जाईल. वास्तविक, मंकीपॉक्ससंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व व्यवस्था महामारीविज्ञान अंतर्गत करावयाच्या आहेत. यामध्ये आजारी व्यक्तींशी संबंधित घटक आणि त्यांची काळजी, निदान, केस मॅनेजमेंट आणि जोखीम याकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे.

''कायम आठवण ठेवू...'', Singer KK च्या निधनानंतर पंतप्रधान मोदी दु: खी

नवीन प्रकरणे वेगाने ओळखली जावीत, असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ नये, यावर भर देण्यात आला आहे. त्याच वेळी, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या पद्धती देखील तपशीलवार स्पष्ट केल्या आहेत. रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवणे आणि रुग्णवाहिकेत बदल करण्याच्या धोरणाचीही माहिती देण्यात आली आहे. आयसोलेशनमध्ये कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, रुग्णाची काळजी घेताना सॅनिटायझरचा योग्य वापर आणि पीपीई किट वापरण्यावर भर देण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Coronavirus