• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 'OnePlus Nord 2' फोन कितपत सुरक्षित? ब्लास्टची दुसरी घटना आली समोर

'OnePlus Nord 2' फोन कितपत सुरक्षित? ब्लास्टची दुसरी घटना आली समोर

‘वनप्लस नॉर्ड 2’ (Nord 2) फोनचे स्फोट (Explosion) होण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच भारतात या फोनचा स्फोट होण्याची दुसरी घटना घडली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 10 ऑगस्ट : चिनी कंपनी वनप्लस (OnePlus) आपल्या अत्याधुनिक स्मार्टफोन्ससाठी (Smartphones) प्रसिद्ध आहे. कंपनी सातत्यानं नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स दाखल करत असते. योग्य किंमत, नाविन्यपूर्ण फीचर्स आणि आकर्षक लूक यामुळे कंपनीचे स्मार्टफोन्स जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातही वनप्लसचे असंख्य चाहते आहेत. कंपनीच्या नवीन फोनकडे चाहत्यांचे लक्ष असते. अलीकडेच कंपनीनं नॉर्ड सीरीज अंतर्गत ‘नॉर्ड 2’ (Nord 2) हा स्मार्टफोन दाखल केला आहे. परवडणाऱ्या किंमतीच्या श्रेणीतील हा फोन येण्याआधीपासूनच त्याबद्दल जोरदार चर्चा होती. मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी या फोनचे बुकिंग केले होते. हा फोन दाखल झाल्यानंतर त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. मात्र या फोनच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण या फोनचे स्फोट (Explosion) होण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच भारतात या फोनचा स्फोट होण्याची दुसरी घटना घडली आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शुभम श्रीवास्तव नावाच्या या युझरनं ट्विटरवर (Twitter) या अपघाताची माहिती दिली आहे. सरकारी अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांनी हा फोन घेतला होता. अचानक त्यांच्या या फोनचा स्फोट झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. यात त्यांना काहीही इजा झालेली नसली तरी त्यांना प्रचंड धक्का बसला असून, ते प्रचंड घाबरले असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या घटनेचे कोणतेही फोटो त्यानं शेअर केलेले नाहीत. शुभमनं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या फोनमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे, असं त्यानं म्हटलं आहे. Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द? दरम्यान, या अपघाताबाबत कंपनीनं कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. मात्र याआधीही एका युझरनं ‘नॉर्ड 2’चा स्फोट झाल्याची तक्रार केली होती. त्याची पत्नी (Wife) सायकलिंग करत असताना या फोनचा स्फोट झाला आणि त्यामुळं तिचा अपघात (Accident) झाल्याचं त्यानं म्हटलं होतं. या अपघाताचे फोटोही त्यानं ट्विटरवर शेअर केले होते. याबाबत कंपनीनं निवेदन जारी केलं होतं. फोनमध्ये कोणताही दोष नसून, बाह्य कारणामुळे हा स्फोट झाल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. मात्र या लागोपाठ घडलेल्या या दोन स्फोटांमुळे या फोनच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त होत असून, याबाबत काहीतरी कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या या नव्या उत्पादनाच्या विक्रीला यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. याआधी सॅमसंगच्या (Samsung) ‘गॅलक्सी नोट 7’च्या बाबतीत अशा स्फोट होण्याच्या घटना घडल्यानं कंपनीनं या फोनचे उत्पादनच बंद केले. यामुळे कंपनीला मोठे नुसकान सोसावे लागले होते. आता वन प्लस काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
First published: