न्यूयॉर्क, 30 जानेवारी: बेडकाचा (Frog) एक पाय (Limb) जर मधून कापला (Cut) तर काही उपायांमुळे तो पुन्हा आहे तसा परत येऊ (Regrow) शकतो, हे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी (US Scientists) सिद्ध केलं आहे. मानवी जीवनासाठी (Human Being) हा अत्यंत मूलभूत आणि महत्त्वपूर्ण निष्कर्ष मानला जात आहे. बेडकांवर होणारे अनेक प्रयोग हे माणसांवरही यशस्वी होत असल्याचं वर्षानुवर्षाच्या अनुभवातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे माणसांवर जे जे प्रयोग करायचे असतात, त्यातील बहुतांश प्रयोग हे बेडकांवर करण्यात येतात. त्यापैकी एकदा तुटलेला अवयव पु्न्हा एकदा पूर्वीप्रमाणेच उगवू शकतो का, याबाबतचा प्रयोग बेडकांवर यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काय आहे प्रयोग? शास्त्रज्ञांनी बेडकाचा मागचा पाय मधूनच कट केला आणि त्यावर औषधोपचार सुरू केले. काही दिवसांनी बेडकाचा पाय वाढायला सुरुवात झाली आणि बेडूक त्याचा वापरही करू लागल्याचं दिसून आलं. बेडकाला आलेल्या पायाच्या नव्या भागात मात्र पूर्वीप्रमाणे हाडं नसल्याचंही शास्त्रज्ञांना आढळलं. विशेषतः पायाच्या पंजाच्या भागात ज्या प्रकारची हाडं असतात, तशी हाडं दुसऱ्यांदा उगवलेल्या पंजात नसल्याचं निरीक्षण या प्रयोगात नोंदवण्यात आलं आहे. मात्र तरीही नव्याने उगवलेल्या पायाचा तसाच उपयोग बेडकाकडून केला जात असल्याचंही दिसून आलं आहे. औषधांच्या वापराने कमाल साधारणतः हात किंवा पाय एकदा तुटला, तर त्याची पुन्हा पूर्ववत वाढ होत नाही. माणसांच्या बाबतीत आणि प्राण्यांच्या बाबतीतही हा अनुभवच आतापर्यंत सर्वांना आलेला आहे. मात्र काही औषध प्रक्रियेचा महिनाभर सलग वापर करून तुटलेला अवयव पूर्ववत करण्याची प्रक्रिया यशस्वी होऊ शकत असल्याचं शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं आहे. हे वाचा- ‘या’ पाच ठिकाणचे लोक पार करतात वयाची शंभरी, असं काय आहे Blue Zones चं सिक्रेट? मानवाला होणार फायदा आतापर्यंत स्टारफिश, खेकडे, पिसवा यासारख्या प्राण्यांचा तुटलेला अवयव पुन्हा उगवू शकत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र मानवामध्ये तुटलेले अवयव पुन्हा पूर्ववत होत नाही. त्यासाठी अशा प्रकारची औषध प्रक्रिया वरदान ठरण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या अपघतांमध्ये आणि इतर कारणांमुळे हात किंवा पाय तुटलेल्या कोट्यवधी व्यक्तींना या प्रयोगामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.