मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता कुत्र्यांसाठीही आला फोन, हवं तेव्हा मारू शकतात मालकाशी गप्पा

आता कुत्र्यांसाठीही आला फोन, हवं तेव्हा मारू शकतात मालकाशी गप्पा

वैज्ञानिकांनी कुत्र्यांना वापरता येईल, असा एक (Scientists invent new phone for specially made for dogs) खास फोन तयार केला आहे.

वैज्ञानिकांनी कुत्र्यांना वापरता येईल, असा एक (Scientists invent new phone for specially made for dogs) खास फोन तयार केला आहे.

वैज्ञानिकांनी कुत्र्यांना वापरता येईल, असा एक (Scientists invent new phone for specially made for dogs) खास फोन तयार केला आहे.

  • Published by:  desk news

वैज्ञानिकांनी कुत्र्यांना वापरता येईल, असा एक (Scientists invent new phone for specially made for dogs) खास फोन तयार केला आहे. अनेकांना आपल्या पाळीव प्राण्यांना सोडून अजिबात करमत नाही. काही जण तर कार्यालयातून थोड्या थोड्या वेळाने फोन करून आपल्या (Love for pets) कुत्र्याची किंवा मांजराची चौकशी करत असतात. कुठल्या वेळी आपला पाळीव प्राणी काय करत असेल, याचाच सतत विचार त्यांच्या डोक्यात चाललेला असतो. अशा सर्वांसाठी वैज्ञानिकांनी एक (New phone for pet lovers) aनवा फोन शोधून काढला आहे.

कसा आहे फोन?

प्रत्यक्षात हे एक यंत्र आहे. याचं नाव आहे प्रोटोटाईप डॉगफोन डिव्हाईस. एखाद्या बॉलप्रमाणे हे यंत्र असतं जे प्राण्यांच्या काही विशिष्ट हालचाली टिपतं आणि सक्रीय होतं. यावरून ऑटोमॅटिक व्हिडिओ कॉल केला जाऊ शकतो. या प्रकारचा हा जगातील पहिलाच फोन असून युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या डॉक्टर इलियेना यांनी ऑल्टो युनिव्हर्सिटीतील त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत तयार केला आहे.

हे वाचा- 'मुलगी झाली हो' मालिकेत शौनक-साजिरीची लगीनघाई! 'झिम्मा' च्या टीमनं लावली हजेरी

आता विरह संपला

प्राण्यांचा विरह यामुळे संपणार असून मालक आणि प्राणी आता थेट एकमेकांच्या संपर्कात राहू शकणार आहेत. वास्तविक, इंटरनेटशी कनेक्ट होऊन व्हिडिओ कॉल करण्याच्या सोयीसाठी अनेक उपकरणं बाजारात उपलब्ध आहेतच. मात्र प्राण्यांना वापरता येतील, असं उपकरण तयार करणं ही शास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक बाब होती. कुत्रा जेव्हा जेव्हा या बॉलशी खेळतो, तेव्हा तेव्हा व्हिडिओ कॉल लागतो आणि समोरील स्क्रीनवर कुत्र्याला त्याचा मालक दिसू शकतो. त्यामुळे आपण या बॉलशी खेळलो की समोर मालक दिसतो, हे कुत्र्याच्या मेंदूत पक्कं होतं. त्याची सवय झाल्यानंतर जेव्हा जेव्हा कुत्र्याला मालकाला काहीतरी सांगायचं किंवा दाखवायचं असेल, तेव्हा तेव्हा तो बॉलशी खेळून ही गोष्ट साध्य करू शकतो.

या उपकरणाचं तमाम पाळीव प्राणीप्रेमी मंडळींनी कौतुक केलं आहे. विशेषतः ज्यांना कामानिमित्त अनेक दिवस घराबाहेर राहावं लागतं, अशांसाठी हा फोन वरदानच ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

First published:

Tags: Dog, Mobile Phone, Phone, Scientist