नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: संपूर्ण जगभरात अवकाशातील अनेक गोष्टींबद्दल वैज्ञानिक (Scientist) संशोधन करत आहेत. त्यात चंद्र, मंगळ (Mars) या ग्रहांच्याबाबतीत अनेक प्रकारचं संशोधन सुरु आहे. भारत (Indian Space Research), अमेरिका (USA). रशिया (Russia) आणि चीनसारखे (China) देश आता मंगळ ग्रहावर नक्की पाणी आहे का जीवन आहे का? (Life on Mars) याबाबतीत संशोधन करत आहेत. मात्र मंगळच का? शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं मंगळ ग्रहावर जीवन असणं का महत्त्वाचं आहे? कोणत्या संकटापासून मंगळ ग्रह आपल्याला वाचवू शकतो? याबद्दल माहिती जाणून घेऊया.
शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावर जाण्याची योग्य वेळ कोणती? याबाबत खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येणाऱ्या काही वर्षांमध्ये पृथ्वीवर Solar Maximum येणार आहे. म्हणजे सूर्याचा प्रकोप धोक्याचा टप्पा ओलांडणार आहे. त्यावेळी मंगळ ग्रहच वाचवू शकणार आहे. यावेळी मंगळ ग्रहावर जाता आलं तर या संकटापासून वाचता येणार आहे.
हे वाचा - ..अन् घरभर पडला रक्ताचा सडा; दिव्यांग पतीनं झोपलेल्या पत्नीला दिला भयंकर मृत्यू
एका विशिष्ट वेळीच मंगळावर जाणं शक्य
या ग्रहावरील दीर्घकालीन अंतराळ उड्डाणांमुळे खगोलशास्त्रज्ञ प्राणघातक किरणोत्सर्गाला सामोरे जाऊ शकतात, ज्यामुळे मेंदूचं नुकसान, पोटाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका होऊ शकतो, परंतु आता यावर एक अभ्यास करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे म्हटलं आहे की, एका विशिष्ट वेळी मंगळावर गेल्यामुळे हे यात्रा सुखकर होणार आहे.
एका रिपोर्टनुसार, मंगळावर सरासरी उड्डाण करण्यासाठी 9 महिने लागतात, त्यामुळे प्रक्षेपणाची वेळ आणि उपलब्ध इंधन लक्षात घेता, हे शक्य आहे की मानवी मिशन मंगळावर पोहोचू शकेल आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत परत येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.