मुंबई, 8 फेब्रुवारी- प्लॅस्टिक (Plastic) ही गोष्ट आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) एक महत्त्वाचा भाग झाली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लॅस्टिक वापरलं जातं. प्लॅस्टिक पर्यावरणासाठी (Environment) घातक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. महासागर आणि समुद्रामध्ये सर्वांत जास्त प्लॅस्टिक कचरा फेकला जातो. त्याचे सागरी परिसंस्थेवर घातक परिणाम होतात. ही गोष्ट टाळण्यासाठी जगातील प्रमुख स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंगनं पुढाकार घेतला आहे. टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्या (fishing nets) आणि समुद्रातील प्लॅस्टिक (Plastic) रिसायकल (recycle) करून गॅलेक्सी स्मार्टफोन्स तयार करण्याची योजना कंपनीनं जाहीर केली आहे. ही नवीन रिसायकल्ड सामग्री (recycled material) वापरून तयार केलेलं पहिलं मेजर प्रॉडक्ट येत्या 9 फेब्रुवारी रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड (Galaxy Unpacked) या इव्हेंटमध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. सॅमसंगने आपल्या प्रेस नोटमध्ये नमूद केलं आहे की, ‘सिंगल यूज प्लॅस्टिकचा (single-use plastics) वापर कमी करण्याचा उद्देश ठेवून आमची ही नवीन उपकरणं तयार करण्यात आली आहेत. रिसायकल्ड कागदासारख्या इतर इको-कॉन्शस मटेरियल (eco-conscious materials) आणि रियाकल्ड पोस्ट-कंझ्युमर मटेरियलचा (PCM) वापर वाढवण्याचे आमचे प्रयत्न यातून दिसतात. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे 6 लाख 40 हजार टन मासेमारी जाळी समुद्रात सोडून किंवा टाकून दिली जातात. या जाळ्यांमुळे मरिन लाईफ (marine life) धोक्यात येतं आणि प्रवाळ खडकांचंही (coral reefs) मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अॅपल (Apple ) हा आणखी एक ब्रँड आहे जो गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाबाबत जागरूक (environment conscious) झाला आहे. कंपनीनं बॉक्समधील चार्जर वगळून ई-कचरा (e-waste) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे कंपनीला त्यांचं डिझाइन बदलणं शक्य झालं आहे. परिणामी यामुळे प्रॉडक्ट शिपिंगचं वजनही कमी झालं आहे. अॅपल पाठोपाठ आता सॅमसंगनेही पर्यावरणाचा विचार करण्यास सुरुवात केला आहे. सॅमसंग ही दक्षिण कोरियातील (South Korean) प्रमुख कंपनी आहे. कंपनीनं आपल्या स्मार्टफोनमधील नवीन मटेरियलबद्दल सविस्तर तपशील उघड केलेले नाहीत. स्मार्टफोन्समध्ये नवीन मटेरियल वापरून कंपनीनं आपलं भविष्य पणाला लावलं आहे. 9 फेब्रुवारीच्या इव्हेंटमध्ये सॅमसंग नवीन गॅलेक्सी एस22 (Galaxy S22) सीरिजचं अनावरण करणार आहे. ही सीरिज एस पेन (S Pen) सपोर्ट मिळवणारी पहिली सीरिज असणार आहे. कंपनी ग्राहकांसाठी तीन व्हेरियंट ऑफर करू शकते आणि मार्केटसाठी रीडिझाईन केलेल्या प्रॉडक्ट्सवर लक्ष केंद्रित करू शकते. हे डिव्हाईस सॅमसंगच्या नवीन Exynos 2200 चिपसेटद्वारे पॉवर्ड असण्याची शक्यता आहे. ही प्रणाली प्रीमियम मार्केटमध्ये स्नॅपड्रॅगन(Snapdragon), अॅपल A15 (Apple A15) आणि गुगल टेन्सॉर (Google Tensor) हार्डवेअरला आव्हान देणारी आहे.येत्या 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटबद्दल युजर्समध्ये कमालीची उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.