Home /News /technology /

सॅमसंगने लॉन्च केला जबरदस्त बजेट Smartphone; पाहा फिचर्स आणि Specifications

सॅमसंगने लॉन्च केला जबरदस्त बजेट Smartphone; पाहा फिचर्स आणि Specifications

सॅमसंग ( Samsung) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन ( smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तोदेखील बजेटमध्ये खरेदी करायचा असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 नोव्हेंबर-   सॅमसंग ( Samsung) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन ( smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तोदेखील बजेटमध्ये खरेदी करायचा असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. कंपनीने हा फोन नुकताच बाजारात लाँच ( launched) केला आहे. सॅमसंग ही एकमेव कंपनी आहे जिचे फोन खूप महाग आणि स्वस्तदेखील आहेत. कंपनीने त्यांच्या बजेट स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करून अधिकृतपणे सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर  (Samsung Galaxy A03 Core)  हा फोन बाजारात लाँच केला आहे. हा फोन म्हणजे गॅलेक्सी A3 कोअर नसून ते एक वेगळे मॉडेल आहे. सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. तो एचडी प्लस डिस्प्ले, सिंगल-कॅमेरा सेटअप आणि UNISOC चिपसेटसह येतो. सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर कलर व्हॅरिएंट आधीच लिस्ट केलेले आहेत. यात काळा आणि निळा हे दोन रंग आहेत. गॅलेक्सी A02 च्या यशानंतर सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर आणण्यात आला आहे. यात एचडी प्लस रिझोल्युशनसह 6.5 इंच एलसीडी स्क्रीन आहे. (हे वाचा:आता Samsung कंपनी बनवणार Foldable स्मार्टफोन; पाहा फीचर्स सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर मध्ये समोरच्या बाजूस 5MP सेल्फी स्नॅपर आहे. मागील बाजूस, एलईडी फ्लॅशसह 8MP सिंगल कॅमेरा सिस्टीम आहे. हे UNISOC SC9863A ऑक्टा-कोअर प्रोसेसरद्वारे कार्य करते. त्यापैकी चार कोअर 1.6Ghz च्या असून, तर इतर चार कोअर 1.2Ghz च्या आहेत.या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB बिल्ट-इन स्टोरेज आहे. सॅमसंगने स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh Li-Po बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये अॅक्सलेरोमीटर, लाइट आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. हा ड्युएल-सिम फोन आहे, ज्यामध्ये नॅनो सिम असू शकते. अवघ्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोन बदलण्याचे प्रमाण ग्राहकांकडून वाढू लागलं आहे. तसंच अनेक जण एकापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरतात. कमी बजेटचा स्मार्टफोन वापरण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. अशा ग्राहकांसाठी सॅमसंग गॅलेक्सी A03 कोअर हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनच्या किमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. परंतु या फोनमध्ये असणारी फीचर्स पाहता, त्याची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असण्याची शक्यता आहे.
    First published:

    Tags: Smart phone, Technology

    पुढील बातम्या