नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : फ्लिपकार्टवर (Flipkart) दिवाळी धमाका डेज सेल (Diwali Dhamaka Days) सुरू आहे. 14 नोव्हेंबरपासून सेलची सुरुवात झाली आहे. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. एका ऑफरमध्ये सॅमसंगचा गॅलेक्सी F41(Samsung Galaxy F41) 6000mAh बॅटरीवाला स्मार्टफोन स्वस्तात घेता येणार आहे. सेलमध्ये इतर फोनवरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. Samsung Galaxy F41 या स्मार्टफोनची किंमत 16,999 आहे. पण सेलमध्ये हा फोन केवळ 10,860 रुपयांत विकत घेता येणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना Flipkart Smart Upgrade चा वापर करावा लागेल. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना HDFC डेबिट/क्रेडिट कार्डमधून पेमेंट केल्यास, 10 टक्के सूट दिली जात आहे. त्याशिवाय, स्पेशल प्राईजअंतर्गत 4500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. Samsung Galaxy F41 मध्ये इनफिनिटी-U सुपर एमोलेड डिस्प्ले, 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी यांसारखे चांगले फीचर्स दिले आहेत.
Your Diwali is going to be #FullOn Fun when you capture every moment like a boss, in a single take. Get the #SamsungF41 at just ₹10,860* with @Flipkart Smart Upgrade Plan and go #FullOn with your celebrations. *T&C apply. https://t.co/BMGZuCFGRi#Samsung pic.twitter.com/0nZZgqV5AG
— Samsung India (@SamsungIndia) November 14, 2020
फोनच्या बेस मॉडेल 6GB+64GB ची किंमत 16,999 रुपये आहे. तर 6GB+128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. सॅमसंगच्या या डिव्हाईसमध्ये 6.4 इंची sAMOLED Infinity-U डिस्प्ले देण्यात आला आहे. Exynos 9611 प्रोसेसर, अँड्रॉईड 10 बेस्ड सॅमसंगच्या OneUI स्किनसह येतो. गॅलक्सी F41 च्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy F41 ला 15W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.