जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Royal Enfield Classic 350 नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

Royal Enfield Classic 350 नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

Royal Enfield Classic 350 नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

भारताची प्रमुख व आघाडीची बाईक (Bike) कंपनी रॉयल एनफील्ड (Royal Enfield) जगभरात प्रसिद्ध आहे. अलीकडेच कंपनीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपल्या बाईकचे काही मॉडेल (Model) लॉन्च केले आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 11 ऑगस्ट : भारताची प्रमुख व आघाडीची बाईक (Bike) कंपनी रॉयल एनफील्ड (Royal Enfield) जगभरात प्रसिद्ध आहे. अलीकडेच कंपनीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपल्या बाईकचे काही मॉडेल (Model) लॉन्च केले आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता ही कंपनी आपली प्रसिद्ध बाईक क्लासिक 350 चे (Classic 350) नेक्स्ट जनरेशन मॉडेल (Next Generation Model) लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी ही बाईक 31 ऑगस्ट 2021 ला लॉन्च करू शकते. भारतातील काही डिलरशिप स्टोअरमध्ये (Dealership Stores) या बाईकचे अधिकृत बुकिंग (Booking) सुद्धा सुरू करण्यात आलं आहे. Classic 350 नेक्स्ट जनरेशनचे डिझाईन कंपनीने Classic 350 नेक्स्ट जनरेशनचे पारंपरिक स्वरूपात डिझाईन (Design) केलं आहे. या मॉडेलमध्ये कंपनीने काही बदल सुद्धा केले आहेत. कंपनीने नवीन मॉडेल Classic 350 मध्ये राउंड शेप रियर व्ह्यू मिरर (Round Shape Rear View Mirror), टियर ड्रॉप (teardrop) शेपमध्ये फ्युएल टॅंक (Fuel Tank), आलिशान फेंडर्स (Fenders), क्रोम बेझल (chrome bezel), रेट्रो स्टाईल सर्क्युलर हेडलॅम्प (Retro Style Circular Headlamp) आणि क्रोम प्लेटेड एक्झॉस्ट (Silencer) दिलेला आहे. त्याच्या फेंडर्समध्ये नवीन स्ट्रिप्स दिलेल्या आहेत. तसंच बाजूचा पॅनेल (Panel) आणि फ्युएल टॅंकवर सी-आकाराचे ग्राफिक्स (C- Shaped Graphics) वापरण्यात आले आहेत. Classic 350 नेक्स्ट जनरेशनचे फीचर्स रॉयल एनफील्डने ही बाइक “J” मॉड्यूलर आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर (Modular Architecture Platform) तयार केली आहे. रॉयल एनफील्डची मेट्योर 350 (Meteor 350) देखील त्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. बाईकमधील वायब्रेशन (Vibration) कमी करण्यासाठी बॅलेन्सर शाफ्टचा (Balancer shaft) समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट अनुभव घेता यावा, यासाठी कंपनीने सर्व आवश्यक बदल केले आहेत. Classic 350 नेक्स्ट जनरेशनचे इंजिन रॉयल एनफील्डने नेक्स्ट जनरेशन Classic 350 मध्ये 349cc क्षमतेचे नवीन फ्युएल इंजेक्टेड इंजिन (Fuel injected Engine) वापरले आहे. हे इंजिन 27Nm चे टॉर्क (Torque) आणि 20.2bhp ची पॉवर जनरेट करते. या बाईकच्या इंजिनला 5 स्पीड गिअरबॉक्स (Gearbox) आहेत. या बाईकला 19-इंचाचे फ्रंट व्हील (Front Wheel) आणि 18-इंचाच्या रियर व्हील (Rear Wheel) सोबतच स्पोक रिम्स (Spoke rims) दिल्या आहेत. या बाईकच्या टॉप मॉडेलला ट्यूबलेस अलॉय व्हील्स (Tubeless alloy Wheels) दिल्या आहेत. हे वाचा -  Good News! 2420 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या TVS Jupiter, वाचा सविस्तर कंपनीने ही बाईक सिंगल आणि डबल सीट या दोन्ही पर्यायांमध्ये सादर केली आहे. या बाईकमध्ये एर्गोनोमिक शेप हँडलबार, मिड सेट फूटपेग आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलचा (Semi-Digital Console) समावेश करण्यात आला आहे. तसंच या बाईकमध्ये एक खास ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टिमही (Tripper navigation system) देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफील्डच्या नेक्स्ट जनरेशन Classic 350 ची किंमत ही सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. हे वाचा -  केवळ 4 रुपयांत करा 100 किमीचा प्रवास, जाणून घ्या या भन्नाट Electric Cycle बाबत बुलेट चालवण्याची खास आवड असणाऱ्या लोकांसाठी ही बाईक नक्कीच पहिली पसंती असणार आहे. आपण सुद्धा बुलेट घेण्याचा विचारात असाल तर या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा (Technology) समावेश असलेल्या बाईकचा नक्की विचारू करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: bullet
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात