मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मानवाला धोक्याचा इशारा! रोबो आपापसात संबंध ठेवून मूल जन्माला घालणार

मानवाला धोक्याचा इशारा! रोबो आपापसात संबंध ठेवून मूल जन्माला घालणार

रजनीकांतचचा Robot सिनेमा पाहिला असेल तर 'चिट्टी' हे भयावह व्हर्जन तुमच्या लक्षात असेलच. सायफाय सिनेमात नाही आता प्रत्यक्षात रोबो आपलं मूल जन्माला घालू शकतील, असं तंत्रज्ञान विकसित होतंय.

रजनीकांतचचा Robot सिनेमा पाहिला असेल तर 'चिट्टी' हे भयावह व्हर्जन तुमच्या लक्षात असेलच. सायफाय सिनेमात नाही आता प्रत्यक्षात रोबो आपलं मूल जन्माला घालू शकतील, असं तंत्रज्ञान विकसित होतंय.

रजनीकांतचचा Robot सिनेमा पाहिला असेल तर 'चिट्टी' हे भयावह व्हर्जन तुमच्या लक्षात असेलच. सायफाय सिनेमात नाही आता प्रत्यक्षात रोबो आपलं मूल जन्माला घालू शकतील, असं तंत्रज्ञान विकसित होतंय.

    नवी दिल्ली, 23 जून : सुपरस्टार रजनीकांत यांच्या रोबो (Robot) चित्रपटातील चिट्टी हे भयावह व्हर्जन तुमच्या लक्षात असेलच. एका रोबोमुळे होणारे फायदे आणि तोटे याचं नेमकं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. आता वैज्ञानिकांनी दावा केला आहे की जर रोबो मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम झाले तर या जगाला चिट्टीच्या एक – दोन नव्हे तर हजारो वाईट व्हर्जन्सचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करुन अनेक पॉवरफूल नॅनो रोबोंचं सैन्य तयार करु शकतील.

    ब्रिटन (UK) आणि नेदरलॅंडमधील (Netherland) वैज्ञानिक अशा प्रकारची प्रणाली विकसित करत आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून रोबो आपापसात संबंध प्रस्थापित करु शकतील तसेच ते मानवी हस्तक्षेपाशिवाय मूल (Child Robot) देखील जन्माला (Birth) घालू शकतात. ही मूलं या मूळ रोबोच्या तुलनेत अनेक पटींनी शक्तिशाली असतील. मात्र रोबोजची संख्या अशा पध्दतीने वाढली तर मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती आता संशोधकांना वाटत आहे.

    यंत्रांमुळे माणसं सापडतील अडचणीत

    या प्रकल्पात सहभागी ब्रिटन आणि नेदरलॅंडमधील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक मशिन्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. या प्रणालीच्या माध्यमातून जी रोबो मुले जन्माला येतील, ती अधिक विध्वंसक असतील.

    फक्त एकच लस कोरोनाचा करणार खात्मा; प्रत्येक व्हेरिएंटसाठी Super vaccine तयार

    कॉम्प्युटर विषयाचे प्राध्यापक एम्मा हार्ट (Emma Hart) यांच्या माहितीनुसार, डिजीटल डिएनएच्या (Digital DNA) माध्यमातून जन्माला आलेल्या रोबो मुलांची क्षमता कित्येक पटींनी जास्त असेल. ब्रीडींग फार्ममध्ये गरजेनुसार रोबो जन्माला घातले जातील. जन्मानंतर हे रोबो नुकसानकारक कृती करु शकतात.

    रोबोला सांभाळणं होईल मुश्कील

    यॉर्क युनिव्हर्सिटीच्या Autonomous Robot Evolution : Cradle To Grave या प्रकल्पानुसार, 4 वर्षांच्या संशोधनानंतर रोबो आई-वडिलांचा डिएनए एकत्रित होऊ शकतो. सर्वप्रथम त्यांचा ब्रेन मॅपिंग करण्यात आला आहे. हा मॅपिंग अत्याधुनिक करण्याचे काम सुरु आहे. यामाध्यमातून जे रोबो जन्माला येतील त्यांना एकूण 6 पाय असतील. या पायांमुळे ते समुद्र खाणी (Sea Mining), अंतराळ आणि न्यूक्लिअर रिअॅक्टर मध्ये काम करू शकतील. नॅनो रोबोजच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात मायक्रो सर्जरी (Micro Surgery) करणे देखील शक्य होईल.

    या रोबोजमध्ये इतकी सगळी गुणवैशिष्टे असली तरी ते नुकसानकारकही ठरु शकतात, असा इशारा वैज्ञानिक वारंवार देत आहेत. टर्मिनेटर सिरीज किंवा ब्लेड रनर 2049 सारख्या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे भविष्यातील या रोबोजच्या संकल्पना अगदी मिळत्याजुळत्या आहेत. याचाच अर्थ मानवाला या रोबोजपासून धोकादेखील तितकाच मोठा असेल.

    First published:
    top videos

      Tags: Robot