जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 123 रुपयांपासून सुरू होतोय 'Jio Bharat V2'चा मासिक प्लॅन

123 रुपयांपासून सुरू होतोय 'Jio Bharat V2'चा मासिक प्लॅन

10 कोटींहून अधिक ग्राहकांना जोडण्याचा कंपनीचा मानस आहे.

10 कोटींहून अधिक ग्राहकांना जोडण्याचा कंपनीचा मानस आहे.

999 या अत्यंत स्वस्त दरात ग्राहकांना हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. त्याचा मासिक प्लॅनदेखील सर्वात स्वस्त आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जुलै : रिलायन्स जिओने 2G ग्राहकांसाठी 2018 मध्ये Jio मोबाईल आणला होता. त्या मोबाईलला आजही 13 कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती आहे. तर आता कंपनीने ‘Jio Bharat V2’ हा 4G मोबाईल लाँच केला आहे. 999 या अत्यंत स्वस्त दरात ग्राहकांना हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. त्याचा मासिक प्लॅनदेखील सर्वात स्वस्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच कंपनी ‘Jio Bharat V2’च्या ग्राहकांना 14GB 4G डेटा देणार आहे, म्हणजेच प्रतिदिन अर्धा GB, जो इतर मोबाईलमधील 2 GB डेटापेक्षा 7 पटीने जास्त आहे. त्याचबरोबर, ‘Jio Bharat V2’ वर एक वार्षिक योजनादेखील आहे ज्यासाठी ग्राहकांना 1234 रुपये द्यावे लागतील.

News18लोकमत
News18लोकमत

कंपनीने 7 जुलैपासून ‘Jio Bharat V2’ ची बीटा ट्रायल सुरू करण्याची घोषणा केली आहे. एचडी व्हॉईस कॉलिंग, एफएम रेडिओ, उत्कृष्ट कॅमेरा, इत्यादी वैशिष्ट्यांनी हा मोबाईल सुसज्ज आहे. या मोबाईलच्या माध्यमातून 10 कोटींहून अधिक ग्राहकांना जोडण्याचा कंपनीचा मानस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात