मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Reliance Jio 5G: आता लोडिंगची कटकट नाही! 'या' शहरातही जिओ 5G सेवा सुरू

Reliance Jio 5G: आता लोडिंगची कटकट नाही! 'या' शहरातही जिओ 5G सेवा सुरू

आता लोडिंगची कटकट नाही!  'या' शहरातही Jio 5G सेवा सुरू

आता लोडिंगची कटकट नाही! 'या' शहरातही Jio 5G सेवा सुरू

रिलायन्स जिओनं देशातील दुसर्‍या शहरात आपली 5G सेवा सुरू केली आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील श्रीनाथजी मंदिरापासून 5G सेवा सुरू झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 22 ऑक्टोबर: रिलायन्स जिओनं देशातील दुसर्‍या शहरात आपली 5G सेवा सुरू केली आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील श्रीनाथजी मंदिरापासून 5G सेवा सुरू झाली आहे. जिओच्या वतीनं सांगण्यात आलं की त्यांची 5G सेवा भगवान श्रीनाथजींना समर्पित आहे. राजसमंद जिल्ह्याव्यतिरिक्त भारतातील फक्त 4 शहरांमध्येच जिओ सेवा उपलब्ध आहे.

लाँच दरम्यान जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी जिओ 5G सेवा भगवान श्रीनाथजींना समर्पित असल्याचं सांगितलं आणि म्हटलं की, देशातील 4 मोठ्या शहरांनंतर आता राजस्थानमधील नाथद्वारामध्येही सेवा सुरु करण्यात आली आहे. जिओने यापूर्वीच देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी सारख्या शहरांमध्ये Jio 5G सुरू केली आहे.

True 5G चेन्नईतही लॉन्च -

राजस्थानमधील नाथद्वारासह, जिओने चेन्नईलाही ट्रू 5G सिटीमध्ये देखील समाविष्ट केलं गेलं आहे. आज चेन्नईमध्येही Jio 5G नेटवर्क सुरू झालं आहे. Jio 5G इंटरनेट नुकतेच देशातील काही शहरांमध्ये सुरू झालं आहे. हळूहळू देशातील इतर भागातही लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.

True 5G काय आहे?

True 5G हे जिओचं नवीन तंत्रज्ञान आहे. जे ग्राहकांना सर्वात अचूक सेवा देते. आत्तापर्यंत देशात कोणाकडेही असे मिक्स स्पेक्ट्रम नाही. स्पेक्ट्रम कव्हरेज, क्षमता आणि गुणवत्तेच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. हा स्पेक्ट्रम 700MHz, 3500MHz आणि 26GHz वर काम करतो.

हेही वाचा: बॅडन्यूज! दिवाळीपासून ‘या’ स्मार्टफोनवर चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे कारण?

राजभोग झांकी दर्शन-

5G सेवा सुरू करण्यासोबतच जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनीही भगवान श्रीनाथजींच्या राजभोग झांकीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत श्लोका अंबानीही होत्या.

आकाश अंबानीनं आपली सेवा भगवान श्रीनाथजींना समर्पित केली. नाथद्वारा हे देशातील काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे जिओची 5G सेवा सुरू झाली आहे.

जिओ वेलकम ऑफर-

रिलायन्स जिओ वेलकम ऑफरही सुरू करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. तथापि ही ऑफर केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही My Jio अॅपमध्ये ही सेवा तपासू शकता. यासाठी तुम्हाला My Jio अॅप उघडावे लागेल.

येथे तुम्हाला वरील जिओ वेलकम ऑफरचं बॅनर दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुम्ही तुमची इंटरेस्ट नोंदवू शकाल. जर तुमच्या शहरात Jio 5G सेवा उपलब्ध असेल आणि तुमचा हँडसेट त्यावर काम करू शकत असेल, तर तुम्ही Jio ऑफर मिळण्याची अपेक्षा करू शकता. मात्र तुम्हाला ऑफरची प्रतीक्षा करावी लागेल.

First published:

Tags: 5G, Reliance Jio