हा प्लॅन Jio च्या मोबाइल App वर दिसतो आहे. परंतु वेबसाइटर सध्या हा पॅक लिस्ट करण्यात आलेला नाही. हा पॅक वॅल्यू सेक्शनमध्ये पाहता येईल. वॅल्यू सेक्शनच्या Other Plan मध्ये हा 1 रुपयांचा प्लॅन लिस्ट करण्यात आला आहे.
1 रुपयाचा प्रीपेड प्लॅन 100 MB डेटासह येतो. या प्लॅनची वॅलिडिटी 30 दिवसांची आहे. याला दहा वेळा रिचार्ज केल्यानंतर जवळपास 1GB डेटा मिळेल.
म्हणजेच तुम्ही केवळ 10 रुपयांत 30 दिवसांसाठी 1 GB डेटाचा फायदा घेऊ शकता. हा प्लॅन कंपनीच्या 15 रुपयांच्या 1GB 4G डेटा व्हाउचरपेक्षा परवडणारा आहे.
Jio चा 1 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. 100MB डेटा ग्राहकांना 30 दिवसांसाठी दिला जातो.
जर एखाद्याला 400MB डेटाची गरज असेल, तर ते या प्लॅनद्वारे चार वेळा रिचार्ज करू शकतात. यामुळे अधिक डेटा असणारा पॅक घेण्याची गरज लागणार नाही.