मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Xiaomi ची धमाकेदार स्मार्टफोन सीरिज लाँच! वाचा Redmi Note 11 चे खास फीचर्स

Xiaomi ची धमाकेदार स्मार्टफोन सीरिज लाँच! वाचा Redmi Note 11 चे खास फीचर्स

 शाओमी कंपनीने (Xiaomi New phone) आता भारतात रेडमी नोट 11 सीरिजमधले (Redmi Note 11 series Smartphone) आपले लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत.

शाओमी कंपनीने (Xiaomi New phone) आता भारतात रेडमी नोट 11 सीरिजमधले (Redmi Note 11 series Smartphone) आपले लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत.

शाओमी कंपनीने (Xiaomi New phone) आता भारतात रेडमी नोट 11 सीरिजमधले (Redmi Note 11 series Smartphone) आपले लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत.

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: शाओमी कंपनीने (Xiaomi New phone) आता भारतात रेडमी नोट 11 सीरिजमधले (Redmi Note 11 series Smartphone) आपले लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनी आज (9 फेब्रुवारी) होत असलेल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटमध्ये (Xiaomi Virtual Launch Event) Redmi Smart Band Pro आणि Redmi Smart TVX 43 सोबतच Redmi Note 11 ही स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. आज होत असलेल्या लाँच इव्हेंटमध्ये सुमारे 11 रेडमी डिव्हाईसेस लाँच होतील, अशी माहिती कंपनीने कार्यक्रम पत्रिकेद्वारे दिली होती. Redmi Note 11 सीरिज चीनमध्ये गेल्या महिन्यात लाँच करण्यात आली होती. या सीरिजमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 S यांचा समावेश होता. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 10 सीरिजनंतर आता येत असलेली रेडमी नोट 11 ही सीरिजदेखील यशस्वी होईल, अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.

हे वाचा-Instagram मध्ये होणार हे 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

आज (9 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता हा लाँच इव्हेंट पार पडला असून, रेडमीच्या अधिकृत यु-ट्यूब चॅनेलवरून (Youtube Channel) त्याचे थेट प्रसारण (Live Streaming) करण्यात आले. Redmi Note 11 सीरिजसह, Redmi Smart Band Pro आणि Redmi Smart TVX 43 आज दुपारी 12 वाजता भारतात लाँच होईल. या लॉंचिंगमधून काय अपेक्षित आहे, त्यावर एक नजर टाकूया.

Redmi Note 11, Note 11 Pro आणि Note 11S गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. भारतात दाखल होत असलेल्या या स्मार्टफोनचं डिझाईन, स्पेसिफिकेशन्स ही चीनमधल्या स्मार्टफोनसारखीच असतील, असं सांगितलं जात आहे. Redmi Note 11 या स्मार्टफोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.43 इंच फूल एचडी एलसीडी डिस्प्ले (HD-LCD Display) असेल, असं म्हटलं जात आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चीपसेटसह 6GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असेल. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी शूटरसह क्वाड रिअर कॅमेरा (Quad Rear Camera) आहे. तसंच यात 33W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

" isDesktop="true" id="666693" >

दुसरीकडे, Redmi Note 11S मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Mediatek HelioG96 चिपसेट असून, 8GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा असून, त्यात 108 मेगापिक्सल प्रायमरी शूटरचा समावेश आहे. यात व्हॅनिला रेडमी नोट 11 प्रमाणेच 33W फास्ट चार्जिंगसह 5000 mAhची बॅटरी आहे.

हे वाचा-आता रुग्णालयातही बनणार Aadhaar Card, मराठी भाषेत देखील असणार आधार कार्डवर माहिती

Redmi Note 11 Pro 5G हा टॉप-एंड व्हेरियंट (Top End Variant) असेल. हा फोन 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाच्या OLED डिस्प्लेसह असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह 8GB पर्यंत रॅम आणि 5000 mAhची बॅटरी असेल. चायना व्हेरियंटमध्ये 67 W फास्ट चार्जिंग आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर, 8 मेगापिक्सलचा वाइड अॅंगल शूटर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

First published:

Tags: Redmi, Xiaomi redmi