Home /News /technology /

बहिणीला देऊ शकता धमाकेदार गिफ्ट, रक्षाबंधनला Google लॉन्च करणार नवा जबरदस्त स्मार्टफोन

बहिणीला देऊ शकता धमाकेदार गिफ्ट, रक्षाबंधनला Google लॉन्च करणार नवा जबरदस्त स्मार्टफोन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला मजेदार गिफ्ट्स देण्यासाठी एक जक्कास ऑफर देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : संपूर्ण देशभर रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोरोनाचं संकट असलं तरी घरातच रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला मजेदार गिफ्ट्स देण्यासाठी एक जक्कास ऑफर देण्यात आली आहे. गुगल लवकरच आपला नवीन पिक्सेल स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीने Pixel 4a चा टीझर जारी केला आहे. 3 ऑगस्टला हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. कंपनी या दिवशी Pixel 4a लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. खरंतर, गुगलने मेमध्ये होणारी I/O परिषद रद्द केली होती आणि म्हणूनच या फोनचं लॉन्चिंगही पुढे ढकलण्यात आलं होतं. गुगलने प्रदर्शित केलेल्या टीझरनुसार, कंपनीचा नवा स्मार्टफोन 3 ऑगस्टला बाजारात येणार आहे. यासोबतच टीझरमध्ये दमदार बॅटरी, पॉवरफूल कॅमेरा, लो लाईट कॅमेरा आणि लॅटिन भाषेतील मॅक्रो लेन्सबद्दलही माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, हा फोटो मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे. मुंबईकरांनो, कळत-नकळत तुम्ही ही मोठी चूक तर करत नाही ना! असू शकतात ही वैशिष्ट्ये हा Google चा नेक्सड मिड रेंज स्मार्टफोन असणार आहे. Pixel 4a स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल. Google चा नया डिवाइस स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसोबत असणार आहे. Google Pixel 4a ची भारत मध्ये iPhone SE आणि OnePlus Nord सोबत स्पर्धा असणार आहे. मोठी बातमी! चिनी TikTok ला अमेरिकेत Microsoft करणार खरेदी फोनमध्ये 5.81 इंचचा पंच होल डिस्प्ले पॅनल देण्यात येण्याची शक्यता आहे. फोनच्या बॅकमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. यासोबतच फोनमध्ये फेस स्कॅनिंगसाठी एरे कॅमरासुद्धा दिला जाऊ शकतो. फोनच्या रियर पॅनलवर 12.2MP चा प्रायमरी लेंस मिळेल, जो 8MP सेल्फी कॅमराला सपोर्ट करेल. दहशतवादी हल्ल्यात 24 वर्षीय जवान शहीद, नोव्हेंबरमध्ये होणार होतं लग्न अशी आशा आहे की, Pixel 4a लाया दिवसांत सगळ्यात कमी किंमतीचा फोन म्हणून बाजारात आणणार आहे. आता किंमतीविषयी बोलायचं झालं तर, Pixel 4a ची किंमत 30 ते 40 हजाराच्या आत असू शकते.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Rakshabandhan

    पुढील बातम्या