मुंबई ही स्वप्ननगरी आहे. यात रोज म्हटलं तरी प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो. आर्थिक राजधानी असणाऱ्या या मुंबईत लोकसंख्या जास्त आहे. अशात सध्या कोरोनामुळे मोठं संकट ओढावलं आहे. पण आता मुंबईकरांसमोर पाणी प्रश्नही गंभीर आहे.
2/ 8
मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा हाच एक पर्याय आहे. अनेक वेळा नकळत आपल्याकडून पाण्याच्या अपव्यय होतो तो टाळा.
3/ 8
कारण, मुंबईकरांना लवकरच पाणीकपतीला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईत आजपासून 20 टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
4/ 8
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतं.
5/ 8
या महिन्याच्या शेवटापर्यंत वाट पाहून प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती याआधीही समोर आली होती. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा योग्य वापर करा आणि पाणी वाया घालवू नका अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.
6/ 8
गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 4.9 लाख दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा आहे. जी ही जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या 34% इतका आहे.
7/ 8
दरम्यान, गेल्या वर्षी 30 जुलै 2019 रोजी एकूण 82% पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे खरंतर, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.
8/ 8
गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे.