जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G Launch in India: प्रतीक्षा संपली! मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला 5G सेवेचा शुभारंभ, ‘या’ शहरांत सर्वप्रथम सेवा

5G Launch in India: प्रतीक्षा संपली! मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला 5G सेवेचा शुभारंभ, ‘या’ शहरांत सर्वप्रथम सेवा

PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोंबरला देशात 5G होणार लाँच, ‘या’ शहरांना सर्वप्रथम मिळणार सेवा

PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोंबरला देशात 5G होणार लाँच, ‘या’ शहरांना सर्वप्रथम मिळणार सेवा

5G Launch in India: आता मात्र देशात 5G सेवेच्या लाँचिंग मुहूर्त निश्चित झाला असून 1 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G सेवा लाँच होणार आहे. ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर:  गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये 5G सेवेबद्दल उत्सुकता आहे. 5G सेवा देशात कधी लाँच होणार याकडे सर्व देशवासीयांचं लक्ष लागून राहिलं होतं. अलीकडेच रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळीपूर्वी देशात 5G सेवा लाँच होणार असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र देशात 5G सेवेच्या लाँचिंग मुहूर्त निश्चित झाला असून 1 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G सेवा लाँच होणार आहे. ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील निवडक शहरांत 5G सेवा लाँच होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे.  पहिल्या टप्प्यांत देशातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु होईल आणि टप्प्याटप्प्यानं पुढील काळात देशभरामध्ये इतर शहरांतही 5G सेवेचा विस्तार केला होईल. देशातील या शहरांमध्ये होणार 5G सेवेचा शुभारंभ:

  • मुंबई
  • दिल्ली
  • हैदराबाद
  • जामनगर
  • कोलकाता
  • बंगलोर
  • चेन्नई
  • लखनौ

5G मुळे आयुष्य होईल सुपरफास्ट: 5G सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर देशातील विविध क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे. एकमेकांशी जलद संपर्क साधणं सोपं होईलच परंतु इतर क्षेत्रांतही 5G मुळं क्रांती होईल. 5G नेटवर्कची वैशिष्ट्ये:

  • 3G/4G पेक्षा 50 पट वेगवान
  • डेटा Mbps नाही तर Gbps स्पीडमध्ये डाउनलोड केला जाईल
  • तुम्ही काही सेकंदात चित्रपट डाउनलोड करू शकाल

हेही वाचाः दिवाळीआधी 5G चा मोठा धमाका, सर्वात मोठा विक्रम करणार  5G सेवेमुळं काय लाभ होणार-

  • वापरकर्ते 4K व्हिडिओ कॉलचा आनंद घेऊ शकतात
  • उच्च दर्जाचे, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन व्हिडिओ कॉल शक्य आहेत
  • उत्तम कनेक्टिव्हिटी, कॉलिंग सुविधा
  • वायफायशिवायही व्हिडिओ गेमिंग, व्हिडिओ चॅट
News18लोकमत
News18लोकमत

अशा प्रकारे  बदलेल कार्यालयीन जीवन-

  • पॉवर, हेल्थकेअर व्यवसायात मोठे बदल होतील
  • 5G ड्रोन, रोबोटिक्सचे स्वप्न साकार होईल
  • 5G अॅपसह कंपन्या अधिक चांगली ग्राहक सेवा देऊ शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात