असीम मनचंदा प्रतिनिधी, नवी दिल्ली : बहुप्रतीक्षीत असलेलं 5G आता १ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाँच होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदा सणासुदीत मोबाईल हँडसेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 5G सेवा सुरू होण्यापूर्वी लोक 5G हँडसेटसाठी खरेदी करत आहेत. यावेळी मोबाइल हँडसेटच्या विक्रीने सगळे रेकॉर्ड मोडेल, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे. 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G सेवा सुरू होणार आहेत. त्याआधीच लोकांनी त्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी लोक सण-उत्सवात मोबाईल हँडसेट बदलण्यावर अधिक भर देत आहेत. विशेषत: 5G हँडसेटची मागणी खूप वेगाने वाढत आहे.
RBI कडून डिजिटल पेमेंट आणखी सुलभ! आता परदेशातूनही होणार सहज पेमेंट, 3 नवे उपक्रमविशेष म्हणजे उत्सव सुरू होताच सॅमसंगने पहिल्याच दिवशी 1.2 दशलक्ष हँडसेट विकले, या कंपनीची हजार कोटींची विक्री झाली आहे. नवरात्रीपासून सेल सुरू आहे. त्यामुळे अनेक जण आता दिवळीपर्यंत फोन घेण्याच्या प्रयत्नात आहे. या सणासुदीच्या हंगामात कंपनीचा व्यवसाय 30% दराने वाढेल अशी कंपनीची अपेक्षा आहे. 5G लाँच झाल्यानंतर देखील खरेदीची ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे अजून ५G चे रिचार्ज किती असणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. जर खिशाला परवडणारे असतील तर आणखी लोक त्याकडे वळतील आणि नवे फोन खरेदी करण्याची शक्यता आहे.
करिअरच्या सुरुवातीला रिटायरमेंट प्लानमध्ये NPSचा समावेश करा, हे आहेत फायदेग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, यावेळी कंपन्या मोबाईल हँडसेटवर 17 ते 60% पर्यंत सूट देत आहेत. सॅमसंगनंतर, उर्वरित कंपन्यांनाही अपेक्षा आहे की या मोबाइल हँडसेटची विक्री मागील वर्षांच्या तुलनेत 40 ते 50 टक्के दराने वाढेल आणि विशेषतः 5G हँडसेटची मागणी वाढेल.
3 गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे मोबाईल हँडसेटच्या विक्रीत घट झाली आहे. यंदा छोट्या शहरांमधून मोबाईल हँडसेटला मोठी मागणी असून त्याची विक्री सर्व विक्रम मोडेल.