जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही करता येतात रिकव्हर, फॉलो करा सोप्या स्टेप्स

इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही करता येतात रिकव्हर, फॉलो करा सोप्या स्टेप्स

इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही करता येतात रिकव्हर, फॉलो करा सोप्या स्टेप्स

इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही करता येतात रिकव्हर, फॉलो करा सोप्या स्टेप्स

प्रत्येक पोस्ट केल्यानंतर तिला किती लाइक्स आणि शेअर्स मिळाले हे वेळोवेळी पाहिलं जातं. पोस्ट डिलीट केली, तर ती परत मिळत नाही; पण ही बाब इन्स्टाग्रामच्या बाबतीत मात्र पूर्णतः खरी नाही. कारण इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेली पोस्ट काही दिवसांपर्यंत पुन्हा रिकव्हर करणं शक्य असतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 डिसेंबर: सोशल मीडिया हा आजच्या युगाचा श्वास आहे असं म्हटलं तरी फारशी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ज्या व्यक्ती सोशल मीडियावर आहेत, त्यांना त्यावाचून करमत नाही. त्यामुळेच प्रत्येक पोस्ट केल्यानंतर तिला किती लाइक्स आणि शेअर्स मिळाले हे वेळोवेळी पाहिलं जातं. पोस्ट डिलीट केली, तर ती परत मिळत नाही; पण ही बाब इन्स्टाग्रामच्या बाबतीत मात्र पूर्णतः खरी नाही. कारण इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेली पोस्ट काही दिवसांपर्यंत पुन्हा रिकव्हर करणं शक्य असतं. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या. इन्स्टाग्राम हा जगातल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याचा उपयोग फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी केला जातो. त्याव्यतिरिक्त स्टोरीज आणि रील्सही यावर शेअर करता येतात. काही वेळा काही युझर्स फोटो, व्हिडिओ किंवा रील डिलीट करतात. डिलीट केलेली पोस्ट नंतर हवी झाली तर साहजिकच समस्या उद्भवते. अशा वेळी इन्स्टाग्राम युझर्सना विशेष फीचर उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेला कंटेंट रिकव्हर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोणताही कंटेंट इन्स्टाग्रामवरून डिलीट केला, की तो अकाउंटवरून तातडीने हटवला जातो; मात्र तिथून तो कंटेंट रिसेंटली डिलिटेड फोल्डरमध्ये जातो. तिथे तो कंटेंट तब्बल 30 दिवस म्हणजेच महिनाभर उपलब्ध असतो. त्यानंतर तो कंटेंट कायमस्वरूपी डिलीट होतो. तसंच, इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली, तर ती 24 तासांपर्यंत स्टोरी अर्काइव्हमध्ये राहते. त्यानंतर ती कायमस्वरूपी डिलीट होते. याचाच अर्थ असा, की डिलीट केलेला कंटेंट या कालावधीत रिकव्हर करता येतो. अँड्रॉइड आणि आयफोनवर हा कंटेंट रिकव्हर कसा करायचा, याबद्दल माहिती घेऊ या. अर्थात हे तंत्र केवळ फोटो, व्हिडिओ अशा मीडिया फाइल्ससाठीच उपयुक्त ठरतं. इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आलेला मेसेज पुन्हा रिकव्हर करता येत नाही. हेही वाचा: इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करताय? या महिन्यापासून किमती वाढणार, वाचा कारण

     कंटेंट रिकव्हर कसा करायचा, याची पद्धत जाणून घेऊ या.

    1 - आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम ओपन करा. 2 - आपल्या प्रोफाइलवर जाण्यासाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या प्रोफाइलवर किंवा आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 3 - वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या More Options वर टॅप करा. 4 - त्यानंतर Activity Controls वर टॅप करा आणि नंतर Your Activity वर टॅप करा. 5 - तिथे Recently Deleted वर टॅप करा. युझर्सनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्यांनी अलीकडेच काही कंटेंट डिलीट केला नसेल, तर खाली ऑप्शन्स दिसणार नाहीत.

    News18लोकमत
    News18लोकमत
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात