SPECIAL REPORT : एका व्हॉट्सअ‍ॅप मिस्ड कॉलने तुमच्यावर ठेवली जाऊ शकते पाळत!

तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमधलं व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप तुमच्यावरच पाळत ठेवण्यासाठी वापरलं जातंय. इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मोबाइलधारकावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं उघड झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 11:01 PM IST

SPECIAL REPORT : एका व्हॉट्सअ‍ॅप मिस्ड कॉलने तुमच्यावर ठेवली जाऊ शकते पाळत!

मुंबई, 01 नोव्हेंबर : 'एनएसओ' या इस्रायली कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरने भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांसह शेकडो जणांच्या स्मार्टफोनमध्ये घुसखोरी केल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने अमेरिकेतील न्यायालयात दिली. हेरगिरीची ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली.

तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमधलं व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप तुमच्यावरच पाळत ठेवण्यासाठी वापरलं जातंय. इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मोबाइलधारकावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं उघड झालं आहे.

भारतच नव्हे तर चार खंडांतील देशांमधील मुत्सद्दी, राजकीय विरोधक, पत्रकार आणि वरिष्ठ सरकारी नोकरशहांवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मे महिन्यादरम्यान दोन आठवडे हेरगिरी सुरू होती, अशीही माहिती पुढे आली आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर 'व्हॉट्सअॅप' हेरगिरी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र पत्रकार किंवा मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात नव्हे तर दहशतवादाविरोधात आणि देशांच्या सुरक्षेसाठी सरकारांना हे तंत्रज्ञान वापराची परवानगी देण्यात येते, असा दावा 'एनएसओ' कंपनीनं केला. या प्रकरणी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारनंही व्हॉट्सअ‍ॅपवरील हेरगिरीविषयी चिंता व्यक्त केली आहे. हे उल्लंघन कशाप्रकारे झाले आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली गेली याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपकडे मागितल्याचं रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

Loading...

हेरगिरी करणारं 'पिगॅसस' काय करतं ?

'एनएसओ' या इस्रायली कंपनीचं 'पिगॅसस' सॉफ्टवेअर कोणत्याही स्मार्टफोनवर इन्स्टॉल करता येतं. केवळ एका व्हॉट्सअॅप मिस्ड कॉलच्या साह्यानं संबंधित व्यक्तीचा स्मार्टफोन हेरगिरी करणाऱ्याच्या नियंत्रणामध्ये जातो. व्हॉट्सअ‍ॅप वरील चॅटिंग, संदेश, फोन क्रमांक, छायाचित्रे, स्मार्टफोनच्या मायक्रोफोनवरही नियंत्रण प्रस्थापित करता येतं.

जगभरातील जवळपास 1400 जणांवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. राजनैतिक अधिकारी, राजकीय बंडखोर, पत्रकार आणि ज्येष्ठ सरकारी अधिकारी आदींवर हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप आहे. परिणामी हे प्रकरण लवकर शमण्याची चिन्हं दिसत नाहीत.

======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: what's app
First Published: Nov 1, 2019 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...