Home /News /technology /

Exclusive: Paytm वॉलेटचा वापर करत असाल, तर हे वाचाच...

Exclusive: Paytm वॉलेटचा वापर करत असाल, तर हे वाचाच...

पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ऍड करण्यासाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज नव्हता. परंतु आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. देशभरात पेटीएमकडे सर्वात मोठा पेमेंट ऑप्शन म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डमधून (Credit Card) पेटीएम वॉलेटमध्ये पैसे लोड करुन अनेक छोटी-मोठी ट्रान्जक्शन करतात. आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ऍड करण्यासाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज नव्हता. परंतु आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे वाचा - Jio युजर्ससाठी खुशखबर; या खास सुविधेसाठी कोणताही चार्ज नाही, Netflixही फ्री 9 ऑक्टोबरपासून लागणार 2% चार्ज www.paytmbank.com वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2020 पासून कोणत्याही व्यक्तीने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज भरावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसटी सामिल असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. paytm हे वाचा - Realmeच्या फेस्टिव्ह सेलची घोषणा; टीव्ही, फोन, वॉच, इयरफोनवर 5 हजारपर्यंतची सूट यापूर्वी 1 जानेवारी 2020 मध्येही काही नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. आतापर्यंत कोणत्याही ग्राहकाने 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम क्रेडिट कार्डने वॉलेटमध्ये ऍड केल्यास, कोणताही चार्ज नव्हता. जर 10 हजारहून अधिक पैसे ऍड केल्यास 2 टक्के चार्ज होता. परंतु आता 9 ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्डमधून कितीही रुपये पेटीएम वॉलेटमध्ये लोड केल्यास 2 टक्के चार्ज लागणार आहे. दरम्यान, पेटीएम टू पेटीएम वॉलेटमध्ये ट्रान्सफर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. तसंच डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकल्यासही कोणताही चार्ज भरावा लागणार नाही.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Paytm, Paytm Money

    पुढील बातम्या