500 रुपये स्वस्तात मिळेल LPG Cylinder; अशा पद्धतीने करा बुक

500 रुपये स्वस्तात मिळेल LPG Cylinder; अशा पद्धतीने करा बुक

31 डिसेंबर 2020 पर्यंत गॅस सिलेंडर पेटीएमवरून बुक केल्यास, 500 रुपये कॅशबॅक मिळवता येईल. भारत गॅस (Bharat Gas), एचपी गॅस (HP Gas) आणि इंडेनचे (Indane) ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : दररोजच्या वाढत्या महागाईदरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरवर (LPG Cylinder) 500 रुपयांचा कॅशबॅक मिळाला तर? आता हे शक्य आहे. गॅस बुकिंगवर 500 रुपयांचा कॅशबॅक मिळवता येणार आहे. ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप पेटीएमवरून (Paytm) ग्राहकांसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत गॅस सिलेंडर पेटीएमवरून बुक केल्यास, 500 रुपये कॅशबॅक मिळवता येईल. भारत गॅस (Bharat Gas), एचपी गॅस (HP Gas) आणि इंडेनचे (Indane) ग्राहक पेटीएमच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप पेटीएमवरून एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे. पेटीएमवरून पहिल्यांदाच गॅस बुकिंग करणाऱ्या युजरला हा 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याआधी कधी पेटीएमवरून गॅस सिलेंडर बुक केला असल्यास, ही कॅशबॅक ऑफर मिळणार नाही.

(वाचा - महिंद्राच्या 'या' गाड्यांवर धमाकेदार ऑफर्स; 3.06 लाखांपर्यंत भरघोस डिस्काउंट)

Paytm वरून कसा बुक कराल LPG Gas Cylinder -

- सर्वात आधी मोबाईलमध्ये पेटीएम अ‍ॅप (Paytm App) ओपन करा.

- अ‍ॅप ओपन केल्यानंतर, स्क्रिनवर कोणताच ऑप्शन दिसत नसेल, तर show more वर क्लिक करा.

- त्यानंतर Recharge and Pay Bills सेक्शनवर क्लिक करा. त्यात Book Cylinder पर्याय निवडा.

- यात FIRSTLPG हा पर्याय निवडा. केवळ FIRSTLPG अंतर्गतच 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

- त्यानंतर Bharat Gas, HP Gas किंवा Indane यापैकी तुमचा गॅस प्रोव्हायडर निवडा.

- गॅस प्रोव्हायडर निवडल्यानंतर गॅस एजेन्सीमध्ये दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी टाका. हे डिटेल्स टाकून Proceed वर क्लिक करा. समोर एलपीजी आयडी, कंज्यूमर नाव आणि एजेन्सीचं नाव येईल. त्याखाली गॅस सिलेंडरसाठी द्यावी लागणारी रक्कम येईल.

(वाचा - घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन)

- Paytm Gas Booking Promocode चा FIRSTLPG प्रोमोकोड, प्रोमोकोड सेक्शनमध्ये टाका. याच प्रोमोकोडवर 500 रुपयांचा कॅशबॅक आहे.

- प्रोमोकोड न टाकल्यास, कॅशबॅक मिळणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ पहिल्यांदाच पेटीएमवरून गॅस बुक करणाऱ्यांसाठीच हा प्रोमोकोड वैध आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 8, 2020, 5:40 PM IST

ताज्या बातम्या